मुंबई विद्यापीठात आता मार्कांचा नवा घोळ

नवनव्या वादांना जन्म देणा-या मुंबई विद्यापीठात आता मार्कांचा नवा घोळ घातला गेलाय. ६० मार्कांची लेखी आणि ४० मार्कांच्या इंटरनल परीक्षेत मिळालेल्या गुणांमध्ये तफावत आढळल्यास इंटरनलचे मार्क कमी करण्याची नवी पद्धत विद्यापीठानं सुरू केलीये. याचा शेकडो विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 5, 2013, 07:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नवनव्या वादांना जन्म देणा-या मुंबई विद्यापीठात आता मार्कांचा नवा घोळ घातला गेलाय. ६० मार्कांची लेखी आणि ४० मार्कांच्या इंटरनल परीक्षेत मिळालेल्या गुणांमध्ये तफावत आढळल्यास इंटरनलचे मार्क कमी करण्याची नवी पद्धत विद्यापीठानं सुरू केलीये. याचा शेकडो विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.
या स्केलिंग डाऊन पद्धतीमध्ये लेखी आणि रनलच्या मार्कांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त तफावत असल्यास हा फरक २० टक्क्यांवर येईल, इतके इंटरनलचे मार्क कमी करण्यात येत आहेत. यामुळे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स तसंच मॅनेजमेंटच्या अनेक विद्यार्थ्यांना कमी झालेत.
नवनव्या वादांना जन्म देणा-या मुंबई विद्यापीठात आता मार्कांचा नवा घोळ घातला गेलाय. ६० मार्कांची लेखी आणि ४० मार्कांच्या इंटरनल परीक्षेत मिळालेल्या गुणांमध्ये तफावत आढळल्यास इंटरनलचे मार्क कमी करण्याची नवी पद्धत विद्यापीठानं सुरू केलीये. या स्केलिंग डाऊन पद्धतीमध्ये लेखी आणि इंटरनलच्या मार्कांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त तफावत असल्यास हा फरक २० टक्क्यांवर येईल, इतके इंटरनलचे मार्क कमी करण्यात येत आहेत.
आर्ट्स, सायन्स, कॉमर्स तसंच मॅनेजमेंटच्या अनेक विद्यार्थ्यांचे गुण कमी झालेत. यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. इतकी मेहनत करून मिळालेले मार्क कमी होणार असतील, तर फायदा काय असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे. तर इंटरनल गुण देणारे प्राध्यापकही खवळलेत.
विद्यापीठानंच आमची नेमणूक केली असताना आम्ही दिलेले गुण मान्य का केले जात नाहीत, असा त्यांचा सवाल आहे. या विरोधात अंधेरीच्या भवन्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी सह्यांची मोहीम राबवलीये. मुंबईतल्या सर्वच कॉलेजमध्ये स्केलिंग डाउनबाबत संतापाची भावना आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.