लाईफलाईनला पर्याय काय?

मुंबईच्या लाईफलाईनला पर्याय म्हणून जलवाहतुकीकडं बघीतलं जातयं. मुंबई आणि उपनगरांना समुद्र किनारा लाभल्यामुळं या पर्यायवर विचार केला गेलाय. या योजनेसाठी राज्य सरकारने प्रस्तावही तयार केला होता. मात्र इतर योजनांप्रमाणेच ही योजनाही सध्या लालफितीत अडकलीय.

Updated: Apr 19, 2012, 11:59 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

बुधवारी रात्री मध्य रेल्वेचं कुर्ला स्टेशन जवळचं सिग्नल केबिन जळून खाक झालं खरं मात्र त्याचे गंभीर परिणाम लोकलमधून प्रवास करणा-यांना भोगावे लागलेत. लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे याचा अनुभव पुन्हा एकादा मुंबईकरांनी घेतलाय.

 

मुंबईच्या लाईफलाईनला पर्याय म्हणून जलवाहतुकीकडं बघीतलं जातयं. मुंबई आणि उपनगरांना समुद्र किनारा लाभल्यामुळं या पर्यायवर विचार केला गेलाय. या योजनेसाठी  राज्य सरकारने प्रस्तावही तयार केला होता. मात्र इतर योजनांप्रमाणेच ही योजनाही सध्या लालफितीत अडकलीय.

 

बुधवारी रात्री मध्य रेल्वेच्या कुर्ल्या जवळील सिग्नल केबिनला आग लागल्यामुळं लोकल ट्रेनचे अक्षरश: बारा वाजले आणि पर्यायने त्याचा फटका मुंबईकरांना बसला. रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी होती. मध्ये रेल्वेकडून योग्य उदघोषण केली जात नव्हती. त्यामुळं प्रवाशांच्या संतापाचा पारवार राहिला नव्हता. चाकरमान्या मुंबईकरांनी बुधवारी लोकल प्रवासा दरम्यान अनंत यातना सहन केल्या. लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन असल्याचं पुन्हा एकदा या घटनेतून एकदा  उघड झालंय.

 

लोकल थांबली की मुंबई ठप्प होते हे वारंवार समोर येवूनही लोकलला मजबूत पर्याय का उभा केला जात नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागलाय. कारण मुंबई, ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या परिसरातील रस्त्यावर वाहतूकीचा ताण दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. विशेषत: मुंबईकडं येणा-या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतोय.

 

लोकल सेवा विस्कळीत झाल्यानंतर या रस्त्यावर पायी चालणं कठीण होवून जातं..या पार्श्वभूमिवर जलवाहतूकीच्या पर्यायावर विचार केला जात आहे. मुंबईला चोहोबाजूने समुद्र किनारा लाभल्यामुळे जलवाहतूक करणं शक्य आहे..गेट वे ऑफ इंडिया ते नवी मुंबई, ऐरोली, ठाणे, कळवा, दिवा , डोंबिवली, कल्याण, गायमुख, वसई, पालघर, डहाणू अशा मार्गाने जलवाहतूक केली जाऊ शकते. सध्या बोटीने नवी मुंबई ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर कापण्यासाठी 20 ते 30  मिनिटे लागतात. जलवाहतूकीचा हा पर्याय खुला झाल्यास वाहतुकीची लोकल आणि रस्त्यावर होणारी वाहतूकीची कोंडी फोडण्यास मदत होणार आहे..तसेच प्रवासाच्या वेळेतही बचत होईल.

 

खरं तर 80च्या दशकातचं मुंबईतील वाहतुकीची समस्या जाणवू लागली होती..या समस्येवर उपाय म्हणून समुद्र मार्गावर विचार केला गेला होता..पण त्यावर प्रस्ताव दाखल होण्यासाठी 90चं दशक उजडावं लागलं..बोरिवली ते नरिमन पॉईंट दरम्यान कॅटामरान आणि हॉवरक्रॅफ्ट चालविण्याचा प्रस्ताव आहे..या जलमार्गावर मार्वे, वर्सोवा, जुहू आणि वांद्रे या ठिकाणी अलिशान जेट्टी उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी बाराशे कोटी रुपये खर्च आपेक्षीत आहे..नरिमन पॉईंट ते बोरीवली हे 40 किलो मीटरचं  अंतर जलमार्गाने अर्धा ते पाऊन तासाच्या आत  पार करता येणार आहे. प्रवासी तसेच त्यांची वाहने बोटीतून वाहून नेहण्याची सोय असणार आहे. बेस्ट बस आणि टॅक्सचे भाडे यांच्या दरम्य़ान कॅटामरानचे भाडे आकारण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे..मात्र हा प्रस्ताव वादामुळं केवळ कागदावरच राहिला आहे. .मुंबईतील जलवाहतुकीसाठी सीडको, एमएमआरडीए आणि राज्य सरकारच्या सहभागातून 750 कोटी रुपयांचा  प्रकल्प जून 2014 पर्यंत पूर्ण करण्याची घोषण अर्थमंत्र्यांनी नुकतेच बजेटमध्ये केलीय.

 

मात्र त्यावर प्रत्यक्षात कारवाई कधी होणार हे आताचं सांगण कठीण आहे..त्यामुळं जलवाहतुकीचा पर्याय सध्यातरी अधांतरीच आहे.मुंबईतील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने मेट्रो आणि मोनो रेलचा मार्ग चोखळला आहे. मेट्रो आणि मोनो मुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असला तरी  हे दोन्ही प्रकल्प चांगलेच रखडले आहेत.

 

जलवाहतूक हा पर्याय असला तरी कोस्टल रोड अर्थात समुद्र किनारी मार्गावरही सरकार विचार करत आहे. मुंबई आणि उपनगरांना जोडणारा 35 किलो मीटरचा कोस्टल रोड तयार करण्याचा आराखडा तज्ज्ञ समितीनं तयार केलाय.लोकल ट्रेन आणि रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी मेट्रो आणि मोनो