देव सापडला!

ब्रम्हांड… अनंत काळापूर्वी निर्माण झालेल्या या ब्रम्हांडाचा अनेक वर्षापासून शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. नेमकी कशी झालीय याची निर्मिती, हा प्रश्न प्रत्येकाला सतावत असतो. अध्यात्म आणि विज्ञान अशा दोन्ही पातळीवर कुतूहल असणाऱ्या विश्वाची निर्मितीवर वैज्ञानिकांनी शिक्कामोर्तब केलंय आणि याच महाप्रयोगातून समोर येतंय ते देवाचं अस्तित्व....

Updated: Jul 5, 2012, 07:08 AM IST

www.24taas.com 

 

ब्रम्हांड… अनंत काळापूर्वी निर्माण झालेल्या या ब्रम्हांडाचा अनेक वर्षापासून शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. नेमकी कशी झालीय याची निर्मिती, हा प्रश्न प्रत्येकाला सतावत असतो. अध्यात्म आणि विज्ञान अशा दोन्ही पातळीवर कुतूहल असणाऱ्या विश्वाची निर्मितीवर वैज्ञानिकांनी शिक्कामोर्तब केलंय आणि याच महाप्रयोगातून समोर येतंय ते देवाचं अस्तित्व....

 

‘सर्न’ संस्थेच्या उघडकीस आलेल्या एका व्हिडिओमध्ये ईश्वरी कण सापडल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, सर्नच्या शास्त्रज्ञांनी जिनिव्हामध्ये पत्रकार परिषद घेऊन ईश्वरी कण सापडल्यावर शिक्कामोर्तब केलंय. ‘हिग्स बोसोन’ असं त्या कणाचं शास्त्रीय नाव आहे. तब्बल 40 वर्षांच्या अथक संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी सृष्टीच्या निर्मितीचं कोडं सोडवलयं. हिग्स बोसोन म्हणजेच ईश्वरी कणांपासूनच ही सृष्टी तयार झाली असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलयं. सूर्य, चंद्र, तारे सारं ब्रम्हांडाचा मुलभूत घटक म्हणजे हिग्स बोसोनचं आहेत असा ठाम विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय. एव्हढचं काय तर तुम्ही-आम्हीदेखील या ईश्वरी कणांचीच निर्मिती असल्याचं जिनिव्हामधल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय. 40 वर्ष हे संशोधन सुरू होतं आणि तब्बल 111 देशांचे शास्त्रज्ञ या संशोधनासाठी दिवस-रात्र काम करत होते. बिग बँग थेअरीवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये अनेक भारतीय शास्त्रज्ञांचा देखील समावेश होता.

 

काय आहेत 'हिग्स बोसोन'ची वैशिष्ट्यं

 

केसाच्या परिघाइतक्या सूक्ष्म आकाराचा प्रॉटॉनचा झोत प्रकाशाच्या वेगानं लार्ज हॅड्रन कोलायडरच्या निर्वात पोकळीत सोडला गेला. ‘सर्न’मधल्या प्रयोगशाळेतील कॉम्प्युटरवर दोन पांढरे स्पॉट दिसले आणि तिथल्या तमाम शास्त्रज्ञांनी ‘दॅटस इट’चा चित्कार केला. जगभरातल्या आठ हजार शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून अखेर इश्वरीय कणांचा शोध जगासमोर आलाय. अनेक वर्षांची मेहनत आणि अब्जावधी रुपये खर्चून होत असलेल्या संशोधनाच्या रहस्यांचा आता उलगडा होतोय. ब्रम्हांडाच्या निर्मितीवेळी नेमकी परिस्थिती कशी होती? नेमक्या कोणत्या अणूपासून बनलं गेलं हे ब्रम्हांड? याच शोधात गुंतलेल्या शास्त्रज्ञांचा महाप्रयोग आता पूर्ण झालाय. ज्येष्ठ शास्त्रज्ञ पीटर हिग्ज, अल्बर्ट आईनस्टाईन आणि भारतीय वैज्ञानिक संत्येद्रज्ञान बोस यांच्या सिद्धांताला मुर्तरूप देण्यासाठी जगभरातल्या शास्त्रज्ञांनी इश्वरीय कणांची सत्यता शोधण्याचा विडा उचलला होता. सर्नमध्ये चाललेल्या या महाप्रयोगाची ४ जुलैला  परिणीती जगासमोर येणार होती,  पण हे घोषित होण्यापूर्वीच सर्नमधून एक व्हीडीओ लिक झाला आणि याच व्हीडीओत गॉड पार्टीकलशी सदृष्य कणांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय.

 

दोन इलेक्ट्रॉनला एकमेकांसोबत प्रकाशवेगानं आदळवण्यात आलं. या प्रयोगाची वारंवार सत्यता तपासली गेली. या प्रयोगात भारतासह जगभरातल्या ८ हजार वैज्ञानिकांनी सहभाग घेतला होता. सर्नच्या प्रयोग शाळेत करण्यात आलेला हा महाप्रयोग जमिनीखाली करण्यात आला. वैज्ञानिकांनी या परमाणू महाप्रयोगासाठी प्रोटोनच्या टक्करीवेळी  झालेल्या प्रत्येक बदलाची नोंद ठेवण्यासाठी जगभरात लाखो कॉम्प्युटरचे जाळे निर्माण केले होते आणि याच कॉम्प्युटर ग्रीडमध्ये मुंबईतील भाभा रिसर्च सेंटरचाही समावेश करण्यात आला आणि या स्फोटाच्या निर्मिती प्रक्रियेच्या वेळेच्या बदलाची क्षणक्षणाची नोंदही करण्यात येतं होती आणि यातूनच उलगडलं गेलंय ब्रम्हा़डांचे रहस्य...

 

विज्ञानाने शोधला देव ! 

सृष्टी