वाहतुकीचा खेळखंडोबा

Updated: Jul 20, 2012, 09:46 PM IST

 

 

 ====================================================================================

.

पश्चिम रेल्वेचे १०० हून अधिक मोटरमन आज अचानक रजेवर गेलेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेचे वाहतूक कोलमडलीय.

काल रात्री विदर्भ एक्सप्रेसनं एका लोकलला धडक दिल्यामुळे मध्य रेल्वेही विस्कळीत झाली होती. तसंच वडाळ्यामध्येही

मोनोरेलच्या कामाचा काही भाग कोसळला. या वेगवेगळ्या घटनांचा परिणाम मात्र आज सकाळपासून वाहतुकीवर मोठ्या

प्रमाणात दिसून येतोय. शुक्रवारचा दिवस असल्यामुळे चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना मात्र याचा चांगलाच फटका बसलेला

दिसून आला. आता रेल्वेच्या खोळंब्यामुळे यात आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. याच खोळंब्यात तुमचाही खोळंबा

झाला असेल तर आम्हाला कळवा. रोडवर, रेल्वे स्टेशनवर सध्या जी दृश्यं दिसत आहेत, ‘झी २४ तास’च्या माध्यमातून

इतरांशीही शेअर करा... तुम्ही आम्हाला फोटोंच्या साहाय्यानं माहिती पाठवू शकता... ठिकाणाचं नाव, वेळ, वाहतुकीची

माहिती आणि फोटो आम्हाला पाठवा...

 

 

 

=====================

 

प. रेल्वे रुळावर, मोटरमनची माघार आश्वासनांवर!

पश्चिम रेल्वेच्या मोटरमनने संप अखेर मागे घेण्यात आलाय. डीआरएमच्या बैठकीत हा निर्णय झालाय. यामध्ये मोटरमनच्या काही मागण्यांवर विचार करणार असल्याचं सांगण्यात आलंय.
=====================