षडयंत्र

Last Updated: Monday, February 18, 2013 - 23:35

www.24taas.com, मुंबई
नवी मुंबईत बांधकाम व्यावसायिक सुनिलकुमारच्या खूनप्रकरणात माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट इमॅन्युअल अमोलीकला अटक करण्यात आली. पार्किंगवरुन झालेल्या वादातून हा खून झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं असलं, तरी या हत्याप्रकरणाला वेगळी किनार तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
शनिवारी नवी मुंबईतल्या वाशी परिसरात बांधकाम व्यावसायिक सुनिलकुमार यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुन्हा एकदा नवी मुंबई हादरुन गेली. भरदिवसा हा प्रकार घडलाय. या हत्येप्रकरणी विश्वकुमार शेट्टियार या आरोपीला घटनास्थळी पकडण्यात आलं आणि त्याच्या चौकशीत इमॅन्युअल अमोलीक या माजी पोलीस अधिका-याचं नाव पुढं आलं. पोलिसांनी इमॅन्युअल अमोलीक अटक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार काही महिन्यापूर्वी बांधकाम व्यावसायिक सुनिल कुमारशी आणि इमॅन्युअल अमोलीक यांच्यात पार्किंगवरुन वाद झाला होता..
आरोपी विश्वकुमार शेट्टियार आणि इमॅन्युअल अमोलीक या दोघांना न्यायालयाने २२ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मयत सुनिलकुमारच्या नातेवाईकांनी मात्र नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केलाय.
बांधकाम व्यावसायिक सुनिल कुमारची त्यांच्या ऑफिससमोरचं भरदिवसा हत्या करण्यात आली. याप्रकरणी एका हल्लेखोराला घटनास्थळी अटक करण्यात यश आलं असलं तरी एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
बिल्डर सुनिलकुमारच्या हत्येप्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय. सुनिलकुमार खून प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडं वर्ग करण्यात यावा अशी मागणी सुनिलकुमार यांच्या मुलाने केली आहे.
बांधकाम व्यावसायीक सुनिल कुमारच्या हत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी नवी मुंबई पोलिसांच्या विश्वार्हतेवर सवाल उपस्थित केला आहे. बिल्डर लॉबीशी नवी मुंबई पोलिसांचं साटंलोटं असल्याचा आरोप सुनिल कुमार यांच्या नातेवाईकांनी केला आहे. सुनिल कुमार यांनी माहितीच्या अधिकाराच्या आधारे नवी मुंबईतील ५०० इमारतींच्या एफएसआयचा घोटाळा उघड केला होता. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोमध्ये सुरु असलेला भ्रष्टाचार समोर आला होता. याप्रकरणी मयत सुनिलकुमार यांनी २०११मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी नवी मुंबई पोलिसांऐवजी मुंबई क्राईम ब्राँचकडं सोपवण्याची मागणी मयत सुनिलकुमार यांच्या मुलाने केली.
नवी मुंबईत अंतरराष्ट्रीय विमान तळाची घोषणा झाल्यानंतर या परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव आलाय..तसेच जमिनी मिळवण्यासाठी काही लोक गुन्हेगारांचा वापर करु लागले आहेत. त्यामुळेच अशा घटनांमध्ये वाढ झाल्याची चर्चा आहे. सुनिलकुमार यांच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी इमॅन्युअल अमोलिकचं, वादाशी जुनचं नातं आहे. जवळपास ४० एन्काऊंटर नावावर असलेल्या अमोलीकला दोन वेळा राष्ट्रपती मेडल मिळालंय.

बांधकाम व्यावसायीक सुनिलकुमारच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलीस दलातील माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट इमॅन्युअल अमोलीकला अटक करण्यात आलीय..अमोलिक १९७६च्या बॅचचा पोलिस अधिकारी असून १९९२मध्ये उल्हासनगरमध्ये एका बनावट चकमकप्रकरणी त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. एकीकडं अमोलीकवर बनावट चकमकीचा आरोप असला तरी दोन वेळा राष्ट्रपती मेडल मिळालं आहे. करीम लाला आणि ढोलकीया या गुन्हेगारी टोळ्यांच्या अनेक गुंडाचा खातमा अमोलीकने केला आहे. मात्र त्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर १९८८मध्ये इमॅन्युअल अमोलीकची मुंबईबाहेर बदली करण्यात आली. अमोलीकच्या नावावर जवळपास ४० एन्काऊंटर असून १९८४ ते १९८८ या काळात त्याने हे एन्काऊंटर केले आहेत..गुन्हेगारी टोळ्यांकडून पैसे घेऊन एन्काऊंटर केल्याचा अमोलिकवर आरोप झाला आहे..आणि त्यामुळेच त्याला निलंबीत करण्यात आली होती. १९८८नंतर इमॅन्युअल अमोलीकने बराच काळा नागपूर आणि नवी मुंबईत घालवला होता.

First Published: Monday, February 18, 2013 - 23:35
comments powered by Disqus