घर घेताय ! जरा थांबा, गृहकर्ज होणार स्वस्त

गृहकर्ज घेणा-यांसाठी चांगली बातमी आहे. बँक आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या येत्या तीन ते सहा महिन्यात स्वस्त फिक्स्ड रेट हाऊसिंग लोनच्या योजना आणणार आहेत. या कर्जांवर पंधरा वर्षांपर्यंत व्याजदरांच्या चढ उतारांचा परिणाम होणार नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 8, 2013, 05:02 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
गृहकर्ज घेणा-यांसाठी चांगली बातमी आहे. बँक आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या येत्या तीन ते सहा महिन्यात स्वस्त फिक्स्ड रेट हाऊसिंग लोनच्या योजना आणणार आहेत. या कर्जांवर पंधरा वर्षांपर्यंत व्याजदरांच्या चढ उतारांचा परिणाम होणार नाही.
गृहकर्ज घेणा-यांना व्याजदरांमध्ये सतत चढ-उतारांना सामोरं जावं लागतं. पण आता त्यामधून कर्जधारकांची सुटका होऊ शकणार आहे. तशी योजना लवकरच बाजारात येणार आहे. बाजारात सध्या फिक्स्ड रेट लोन पावणे बारा ते पावणे चौदा टक्क्यांनी मिळतं. पण आता नव्या योजनांनंतर साडे दहा ते पावणे अकरा टक्क्यांपर्यंत लोन मिळू शकणार आहे.
बँक आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या येत्या 3 ते 6 महिन्यांत स्वस्त दराची फिक्स्ड रेट लोन आणण्याच्या विचारात आहेत. अशा कर्जासाठी बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना नॅशनल हाऊसिंग बँकेकडून स्वस्त कर्ज मिळणार आहे.

सुरुवातीला बँकांना 10 लाखांपर्यंतच्या हाऊसिंग लोनसाठी नॅशनल हाऊसिंग बँकेकडून साडे आठ ते पावणे नऊ टक्क्यांनी कर्ज मिळेल. बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या ग्राहकांना हे कर्ज साडे दहा ते पावणे अकरा टक्क्यांच्या फिक्स्ड दरानं देऊ शकतील
बाजारात सध्याही फिक्स्ड रेट होम लोन उपलब्ध आहे. पण फ्लोटिंग आणि फिक्स्ड रेटमध्ये बरंच अंतर आहे. त्यामुळेच ग्राहक फ्लोटिंग रेटची कर्ज घेतात. बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांनी फ्लोटिंगच्या बदल्यात फिक्स्ड रेटच्या कर्जाच्या योजना वाढवाव्यात, अशा सूचना रिझर्व्ह बँकेनं केल्यायत. आता या योजना प्रत्यक्षात कधी येणार, याची ग्राहक वाट पाहतायत.