४२ वर्षांनी मिळाला न्याय

By Jaywant Patil | Last Updated: Monday, February 4, 2013 - 20:08

www.24taas.com, अंबरनाथ
ट्रकच्या अपघातात पाय गमावावा लागलेल्या एका मूकबधीर मुलाला तब्बल 42 वर्षांनी न्याय मिळाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ जवळ वडोल गावात राहणा-या दिलीप म्हात्रे यांच्या लढ्याची ही कहाणी आहे.
मूकबधीर असलेल्या दिलीप यांना वयाच्या सातव्या वर्षी भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत पाय गमवावा लागला. आधीच मूकबधीर असलेल्या दिलीप यांचा पायही काळाने हिरावून नेल्याने त्याला चालणेही कठीण झाले होते. मात्र तरीही दिलीप आणि त्यांचे कुटुंब डगमगले नाहीत. ट्रकचालक आणि विमा कंपनीविरोधात त्यांनी लढा दिला.
तब्बल ४२ वर्षानंतर त्याच्या या लढयाला यश आले आणि वाहन अपघात दावा लवादाने त्यांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत, उशिरा का होईन आम्हाला न्याय मिळाला अशी भावना दिलीप म्हात्रे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

First Published: Monday, February 4, 2013 - 20:08
comments powered by Disqus