पाहा - कोयनेत पाण्याखाली अनोखा आविष्कार

By Surendra Gangan | Last Updated: Friday, January 3, 2014 - 13:12

www.24taas.com, झी मीडिया, सातारा
स्थापत्य अभियांत्रिकीचा अनोखा आविष्कार सध्या कोयनेच्या पाण्याखाली अनुभवायला मिळतोय. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या देखभाल दुरूस्तीच काम सध्या सुरु आहे. कोयनेच्या टीमनं दाखवलेलं धाडस तसेच कौशल्यामुळ आपल्या राज्याचं सुमारे १६०० कोटींचं संभाव्य नुकसान टळलं आहे.
खोल पाण्याखाली आतषबाजी करण्यात आली. हे वाचून आश्चर्य वाटेल. मात्र हे खरं आहे. कोयनेच्या पाण्याखाली सुरु असलेलं हे ऑपरेशन ट्रॅश रॅक (trash rack) आहे. महाराष्ट्राची लाईफलाइन समजल्या जाणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पातील कोळकेवाडी धरण ओळखले जाते.प्रकल्पाच्या टप्पा ३ ची वीज निर्मिती या ठिकाणी होते.
१९७९ मध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प पूर्णत्वाला आला. त्यावेळी पाण्यातील कचरा अथवा कुठल्याही स्वरुपाची वस्तू टर्बाईनमध्ये जाऊ नये, म्हणून टर्बाईनबाहेर पाण्याखाली मोठमोठ्या जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. कोळकेवाडी प्रकल्पाच्या चार गाळ्यांमध्ये मिळून छत्तिस जाळ्या बसविण्यात आल्या होत्या… तीन दशकानंतर जीर्ण झालेल्या या जाळ्या बदलण्याचं काम सध्या सुरु आहे.
तब्बल ४ टन वजनाच्या जाळ्यांच्या जागी नवीन जाळ्या बसविण्यात येतायेत. त्यासाठी पन्नास ते साठ फुट खोल पाण्यात बिनचूकपणे काम करू शकणारे कुशल पाणबुडे त्यांचं कसब पणाला लावतायत. विशेष म्हणजे याकामी केवळ सात कोटी खर्चून आपल्या अभियंत्यांनी सरकारच्या तिजोरीवरील अनाठाई भार टाळला आहे.
महाजेनकोकडून विशिष्ट काळासाठी वीज निर्मिती थांबविण्याची परवानगी मिळाल्या नंतरच हे काम करावं लागतं. कोळ्केवाडीमध्ये गेले दोन वर्षे ही दुरुस्ती मोहीम सुरु आहे. आज ती पूर्णत्वाकडे आहे. हा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात आलाय. यापूर्वी कोयनेच्या पाण्याखाली बोगदा करण्यासाठी स्फोट घडविण्याचा आविष्कार आपण अनुभवलाय. त्या लेक टॅपिंग इतकेच हे ऑपरेशन ट्रॅश रॅकही महत्वाचं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ

First Published: Friday, January 3, 2014 - 13:04
comments powered by Disqus