कहाणी मलालाची...

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, October 15, 2012 - 22:47

www.24taas.com, मुंबई
पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात राहणाऱ्या एका १४ वर्षाच्या चिमुरडीने कट्टर तालिबान्यांविरोधात बंड केलं. मुलींच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी तिने आवाज उठवला खरा पण त्याची जबर किंमत तिला मोजावी लागली. तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात ती निरागस मुलगी गंभीर जखमी झाली. पण त्यानंतर मात्र तालिबान हादरुन गेलंय. तालिबानला आता तिची भीती वाटू लागलीय. तोफांच्या भडीमारालाही न घाबरणारे तालिबानी त्या चिमुरडीला का घाबरलेत? अशी कोणती ताकत आहे त्या कोवळ्या मुलीकडं? जिवघेण्या हल्ल्यातून बचावणार का ही मुलगी? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊयात... ‘कहाणी मलालाची’मध्ये

स्वातचं खोरं... पाकिस्तानातील अत्यंत सुंदर असं डोंगराळ भभाग... निसर्गसौंदर्याने नटलेला... कधी काळी इथं प्रेमाचं संगीत इथं ऐकायला मिळायचं. पण, आज त्याची जागा गोळीबाराच्या कर्कश्य आवाजाने घेतली. त्यामुळे इथलं सगळं वातावरणचं बदलून गेलंय. सुख, शांती, प्रेम या सगळ्यालाच तालिबान्यांच्या दहशतीने ग्रासलंय. ९ ऑक्टोबर २०१२... मिंगोरा, स्वात खोरं... चिमुकल्या डोळ्यात उज्वल भविष्याचे स्वप्न घेऊन काही शाळकरी मुली शाळेतून घरी परतत होत्या. पण अचानक त्यांची स्कूल काही शस्त्रधारी लोकांनी वाटेत अडवली. बसमधील त्या चिमुरड्या मुलींना मोठी दाढी असलेल्या एका सशस्त्र व्यक्तीने दरडावून विचारलं, ‘तुमच्या पैकी मलाला कोण आहे? सांगा नाहीतर सगळ्यांना गोळ्या घालीन...’ त्या चिमुरड्यामुलींमध्ये मलालाही होती. पण तिच्या चेहऱ्यावर भितीची एकही लकेरही नव्हती... ना तिने लपण्याचा प्रयत्न केला. त्या सशस्त्र व्यक्तींसमवेत असलेल्या एकाने मलालाला ओळखलं आणि त्यानं १४ वर्ष वयाच्या मलालाच्या डोक्याजवळ बंदूक नेली आणि तिचा चाप ओढला. कोवळ्या शरिरात गोळ्या घुसल्यामुळे मलाला गंभीर जखमी झाली. सैतानी तालिबान्यांच्या गोळीबारात मलालाचं शरिर जरी जखमी झालं असलं तरी तिच्या जबरदस्त हिंमतीवर ते जराही ओरखडा ओढू शकले नाहीत. रुग्णालयात जाते वेळी मलालाचे नाजूक हात तिचे पिता युसुफजई यांच्या हातात होते. तिची ती अवस्था पाहून युसुफजईंनी धीर सोडला होता. पण छोटी मलाला किलकिल्या डोळ्यातून पहात पित्याला म्हणली. ‘चिंता करु नका, मी बरी होईल... शेवटी विजय आपलाच होणार आहे’. बेशुद्ध होण्यापूर्वी मलालाने हे शेवटचं वाक्य उच्चारलं होतं. पण त्या कोवळ्या मुलीचा तो आवाज संपूर्ण स्वात खोऱ्यात घुमला. तिच्या आवाजापुढं तालिबान्यांच्या बंदूकीचा आवाजाही फिका पडला. विशेष म्हणजे मलालाचा तो आवाज अवघ्या जगाने ऐकला.
१४ वर्षाच्या मलाला युसुफजाईने वयाच्या ११व्या वर्षी तालिबान्यांविरोधात आवाज उठवला होता. तालिबान्यांनी मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्याचा फतवा काढला होता. त्याचा मलालाने विरोध केला होता. २००९ मध्ये बीबीसीच्या उर्दू ब्लॉगवर टोपण नावाने तिने लिखाण सुरु केलं. तालिबान्यांच्या अत्याचाराला तिने ब्लॉगच्या माध्यमातून वाचा फोडली होती. तोफांच्या भडिमारालाही न घाबरणारे तालिबानी मलालाच्या लिखाणामुळे हादरुन गेले होते. तालिबान हारलं खरं पण त्यांच्या भ्याड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मलालाच्या प्रत्येक श्वासाने स्वात खोऱ्यात नव्या क्रांतीला जन्म दिला होता. स्वात खोऱ्यात मुलींच्या शिक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरु लागला आहे. तसेच मलाला लवकर बरी व्हावी यासाठी जगभर प्रार्थना केली जातेय. मलालाला उपचारासाठी स्वात खोऱ्यातून रावळपिंडीच्या सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथं तिच्या डोक्यात घुसलेली गोळी काढण्यात आली. पण तिची प्रकृती नाजूक बनल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी ब्रिटनला हलवण्यात आलंय.

चिमुरड्या मलालाने कट्टर तालिबान्यांना आव्हान दिलं आणि तालिबान्यांनी तिच्यावर जिवघेणा हल्ला केला. पण मलालामध्ये इतकी हिम्मत आली कुठून असा प्रश्न पडल्या शिवाय राहात नाही. ब्रिटिश युध्दातील विरांगना कवयत्री मलालाईच्या नावावरुन जिया युसुफजई यांनी आपल्या मुलीचं नामकरणं मलाला ठेवलं होतं. मलालाईप्रमाणे आपल्या मुलीने शूर आणि निडर व्हावं, अशी युसुफजईंची सुरुवातीपासूनची इच्छा होती. जेव्हा युसुफजईंनी तिचं मलाला हे नाव ठेवलं तेव्हा पुढं आपली मुलगी इतकी शूर आणि क्रांतीकारी होईल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. त्यांनी ११ वर्षाच्या मलालाला स्वातंत

First Published: Monday, October 15, 2012 - 22:23
comments powered by Disqus