कौरव-पांडव कोण हे जनताच ठरवेल - अजित पवार

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप जोरदार होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. पाच जण एकत्र आले म्हणून पांडव बनत नाहीत, असा टोला अजित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावलाय. सत्तेपासून बाहेर गेल्यानं विरोधकांची बडबड सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 6, 2014, 05:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप जोरदार होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. पाच जण एकत्र आले म्हणून पांडव बनत नाहीत, असा टोला अजित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावलाय. सत्तेपासून बाहेर गेल्यानं विरोधकांची बडबड सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.
अभिनेत्री नवनीत राणा यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. तसेच त्यांनी जात प्रमाणपत्र खोटं दिल्याप्रकरणी कोर्टाने ताशेरे ओढले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकसभा उमेदवार नवनीत या अडचणीत आल्या आहेत. याबाबत लक्ष घालण्याचे अजित पवार म्हणालेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत कौर यांच्याप्रकरणात रवी राणा यांच्याशी बातचित झाली असून राणा कोर्टात आपली भूमिका मांडणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. बोगस जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी कौर यांच्याविरोधात मुलुंडमध्ये गुन्हा दाखल दाखल होण्याची शक्यता आहे. कलम १५३ अंतर्गत हा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
गारपीटग्रस्त भागात मदत करण्यासाठी निवडणूक आचारसिंहेतेचं दडपण नसेल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. या भागातले पंचनामे, सर्वेक्षण सचिव करत असून ते पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत दिली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.
काय म्हणालेत अजित पवार
- कौरव कोण, पांडव कोण हे जनताच दाखवेल
- पाच जण एकत्र आले म्हणून पांडव बनत नाहीत
- अजित पवार यांचा महायुतीला टोला
- सत्तेपासून बाहेर असल्यामुळे विरोधकांची बडबड
- कडबोळं एकत्र करून मोट बांधली जातेय
- जनता दूधखुळी नाही
- नवनीत राणा यांच्या प्रकरणात लक्ष घातलंय
- रवी राणा यांच्याशी बातचीत केलीय
- राणा कोर्टात आपली भूमिका मांडणार
- गारपीट भागात मदत करणार
- आचारसंहितेच अडचण नसेल
- सचिव तपासणी करताहेत
- प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळालाय
- राष्टवादीनं सभा सुरू केल्या आहेत
- माढा व सोलापूरमध्ये शरद पवार, सुशिलकुमार शिंदे यांची होईल सभा
- मावळ, हातकणंगले, हिंगोली लवकर जाहीर होईल
- मुंडे विरोधात सुरेश धस योग्य उमेदवार
- बीडमध्ये उत्तम लढत होईल
- धस बळीचा बकरा, मुंडेंनी केले होते वक्तव्य
- आघाडीच्या विश्वासाला तडा जाणार नाही
- आम्ही एकत्र काम करतोय

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.