आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार?

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यताय. आतापर्यंत भाजप शिवसेना राष्ट्रवादी आम आदमी पक्षानं आपल्या उममेदवारांची यादी घोषित केलीये.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 7, 2014, 05:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यताय. आतापर्यंत भाजप शिवसेना राष्ट्रवादी आम आदमी पक्षानं आपल्या उममेदवारांची यादी घोषित केलीये.
काँग्रेसच्या पहिल्या यादीत आज ९०हून अधिक उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यताय. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरातमधल्या उमेदवारांची वर्णी पहिल्या यादीत लागण्याची शक्यताय. यात महाराष्ट्रातील काँग्रेसचे १५ उमेदवारांचं नाव निश्चित करण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय.पहिल्या यादीत कुठल्या उमेदवारांना संधी मिळते, कुठली मोठी नावं आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
यांना मिळणार पुन्हा संधी?
> संजय निरुपम- उत्तर मुंबई
> गुरुदास कामत - उत्तर पश्चिम
> प्रिया दत्त- प्रिया दत्त
> मिलिंद देवरा- दक्षिण मुंबई
> निलेश राणे - रत्नागिरी-सिंधुदुर्ग
> सुशीलकुमार शिंदे- सोलापूर
> प्रतीक पाटील- सांगली
> भाऊसाहेब वाकचौरे - शिर्डी
> माणिकराव गावित - नंदुरबार
> मुकुल वासनिक - रामटेक
> मारुतराव कोवासे- गडचिरोली-चिमूर
> अमरिश पटेल- धुळे
यांच्यापैकी कुणाला उमेदवारी ?
> चंद्रपूर - संजय देवतळे की नरेश पुगलिया
> औरंगाबाद - राजेंद्र दर्डा की कल्याण काळे
> पुणे - विनायक निम्हण, मोहन जोशी की विश्वजित कदम
यांची उमेदवारी नक्की
> विश्वनाथ पाटील - भिवंडी
> एकनाथ गायकवाड - द.मध्य मुंबई
> विलास मुत्तेमवार - नागपूर

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.