मतदानासाठी मतदान ओळखपत्र नसेल तर हरकत नाही!

तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर काहीही हरकत नाही. तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावू शकता. मात्र, निवडणूक आयोगाने निवडणूक ओळखपत्राशिवाय अकरा पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी एक पुरावा असेल तर सहज तुम्हाला मतदान करता येऊ शकेल.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 9, 2014, 04:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर काहीही हरकत नाही. तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावू शकता. मात्र, निवडणूक आयोगाने निवडणूक ओळखपत्राशिवाय अकरा पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी एक पुरावा असेल तर सहज तुम्हाला मतदान करता येऊ शकेल.
राज्यात 10 एप्रिलला विदर्भात मतदान होत आहे. देशातील हा तिसरा टप्पा आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती (अ.जा.), वर्धा, रामटेक (अ.जा), नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर (अ.ज.), चंद्रपूर व यवतमाळ-वाशिम या मतदार संघात मतदान होत आहे. त्यासाठी तुम्ही अकरा पर्यायापैकी कोणतेतरी एक ओळखपत्र दाखविणे आवश्यक आहे.
मतदान करण्यासाठी तुमच्याजवळ पासपोर्ट, वाहन परवाना, केंद्र तसेच राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी त्यांच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे छायाचित्र ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँक, पोस्ट खात्याचे पासबुक, पॅनकार्ड, आधार कार्ड, आर.जी.आय.ने एन.पी.आर अंतर्गत दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, कामगार मंत्रालयाचे स्वास्थ्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले सेवानवृत्तीचे कागदपत्र, निवडणूक विभागामार्फत देण्यात आलेली प्रमाणित छायाचित्र मतदार चिठ्ठी यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.