तयारी लोकसभेची : `राष्ट्रवादी`चे संभाव्य उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील लोकसभा जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू असतानाच काही महत्त्वाच्या जागांवर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केले आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 18, 2014, 05:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील लोकसभा जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू असतानाच काही महत्त्वाच्या जागांवर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केले आहेत. नाशिकमधून छगन भुजबळ, रावेरमधून अरुण गुजराथी या नव्या चेहऱ्यांना यंदा संधी दिली जाणार आहे. नगरमधून राजीव राजळे, कोल्हापूरमधून धनंजय महाडीक यांच्या नावावर शिकामोर्तब झालंय. तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून विलास लांडे, बीडमधून सुरेश धस, माढामधून विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत प्राधान्याने विचार असून पुढील काही दिवसात यावर शिकामोर्तब करण्याची शक्यता आहे, अशी माहिती राष्ट्रवादीतल्या सूत्रांनी दिलीय.
काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात २६-२२ फार्मुला अंतिम झाला असून आता राष्ट्रवादीनं नाशिकमधून छगन भुजबळ, रावेरमधून अरुण गुजराथी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय. नगर लोकसभा मतदार संघातून राजीव राजळे, कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांची नावे फायनल केलीत. रायगड, हिंगोली, रावेर, अमरावती या जागाची काँग्रेस- एनसीपीत मतदार संघ आदलाबदलबाबत चर्चा सुरू असल्यानं येत्या काही दिवसातचं इथला उमेदवार अंतिमबाबत तोडगा काढला जाईल, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.
एकाबाजूला महायुतीने प्रचाराची घोडदौड सुरू केलीय. सभा वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत. त्यामुळं एनसीपीनं २२ जागा उमेदवार निश्चित केल्याची सूत्राची माहिती आहे.
राष्ट्रवादीचे लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार
बारामती - सुप्रिया सुळे
ठाणे - संजीव नाईक
परभणी - विजय भांबरे
मुंबई उत्तर पूर्व - संजय दीना पाटील
उस्मानाबाद - डाँ. पद्मसिंह पाटील
कोल्हापूर - धनंजय महाडीक
नाशिक - छगन भुजबळ
रावेर - अरुण गुजराथी
नगर - राजीव राजळे

सध्या नावाला शिवसेनेत असलेले कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांना पहिल्याxदा राजीनामा द्यावा लागेल, त्यानंतर त्यांना एनसीपीचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
मतदार संघ - उमेदवारावर शिक्कामोर्तब शक्यता
माढा - विजयसिंह मोहिते पाटील
शिरुर - विलास लांडे
बीड - सुरेश धस

कोल्हापूर, हिंगोली या लोकसभामध्ये कोणत्याही एका उमेदवारावर शिक्कामोर्तब झाला तरी बंडखोरी होणार आहे, त्यामुळं पक्षानं खबरादी घ्यायचं ठरवलयं. महायुतीच्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर काही मतदार संघाची उमेदवारी यादी अधिकृत जाहीर करण्याचा निर्णय एनसीपीनं घेतलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.