वक्तव्याबद्दल खेद, विषय इथंच संपवा - शरद पवार

दोनदा मतदान करा, या वादग्रस्त विधानाप्रकरणी शरद पवारांनी निवडणूक आयोगाला उत्तर दिलंय. माझ्या वक्तव्याबद्दल झालेल्या गोंधळामुळे मी खेद व्यक्त करतोय. तसंच हा विषय इथेच संपवावा, अशी विनंती शरद पवारांनी केलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 26, 2014, 07:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दोनदा मतदान करा, या वादग्रस्त विधानाप्रकरणी शरद पवारांनी निवडणूक आयोगाला उत्तर दिलंय. माझ्या वक्तव्याबद्दल झालेल्या गोंधळामुळे मी खेद व्यक्त करतोय. तसंच हा विषय इथेच संपवावा, अशी विनंती शरद पवारांनी केलीय.
शाई पुसा, हे विधान गमतीनं केलं होतं, असं उत्तर शरद पवारांनी दिलंय. कुणीही दोनदा मतदान करावे, असं सांगण्याचा उद्देश नव्हता. त्याचबरोबर हा कार्यक्रम राजकीय नव्हता, असं उत्तर शरद पवारांनी दिलंय. किरीट सोमय्यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, असं पवारांनी म्हंटलंय.
पवारांनी नवी मुंबईत दोनदा मतदान करण्याबाबत विधान केल्यावर या प्रकरणाची चर्चा सुरु झाली होती. विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली. त्यानंतर पवारांच्या या वादग्रस्त विधानाप्रकरणी निवडणूक आयोगानं नोटीस बजावली होती. त्यानुसार आता शरद पवारांनी खुलासा सादर केला आहे,

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.