बप्पीदांचा प्रचार करणार लता, आशा आणि सलमान !

आगामी लोकसभा निवडणूकीत पश्चिम बंगाल मधील लोकांना प्रचाराच्यावेळी अनेक बॉलिवूड व्यक्तींना भेटण्याची संधी मिळणार आहे. कारण आहेत बप्पीदा!

Updated: Apr 3, 2014, 10:08 AM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, कोलकता
आगामी लोकसभा निवडणूकीत पश्चिम बंगाल मधील लोकांना प्रचाराच्यावेळी अनेक बॉलिवूड व्यक्तींना भेटण्याची संधी मिळणार आहे. कारण आहेत बप्पीदा!
लोकसभा निवडणूकीसाठी श्रीरामपूर (पश्चिम बंगाल) मधून भारतीय जनता पार्टीची (भाजप) उमेदवारी सुप्रसिद्ध संगीतकार बप्पी लेहरी यांना दिलीय. बप्पीच्या प्रचारात बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान आणि गानकोकिळा लता मंगेशकर किंवा आशा भोसलें यांच्या सहभागाची शक्यता आहे.
डिस्को किंग बप्पी यांनी हुगळी जिल्ह्यातील मतदारसंघ श्रीरामपूरला एक पर्यटन स्थळ बनवण्याची इच्छा व्यक्त केलीय. या मतदारसंघाला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकर बघायला मिळतील. बप्पी यांच्या प्रचार मोहीमचे व्यवस्थापक कृष्णा भट्टाचार्य यांनी सांगितलं की, सलमाननं प्रचारासाठी अनुमती दिलीय. बप्पी यांचं सलमान आणि ऋतिक रोशन या बॉलिवूडच्या कलाकारासोबत खूपचं जवळचं नातं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.