सेनेचे खासदार भराडी देवीच्या दर्शनाला...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अठरा नवनिर्वाचित 18 खासदारांना घेऊन आज भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत....

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 25, 2014, 11:16 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अठरा नवनिर्वाचित 18 खासदारांना घेऊन आज भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत....
शिवसेनेचं हे ‘दर्शन’ म्हणजे काँग्रेस नेते आणि सिंधुदुर्गातील मोठं प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायण राणे यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. नारायण राणे यांच्या मुलाचा - निलेश राणे यांचा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभव शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी पराभव केला होता. निलेश राणे यांचा पराभव हा माझा स्वत:चा पराभव आहे, असं नारायण राणे यांनी निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
राणेंच्या मतदारसंघातील उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे राज्याचं लक्ष लागलंय. राणेंनी २००५ मध्ये शिवसेना सोडली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला कोकणात धोबीपछाड दिली होती. यंदा मात्र जवळ-जवळ १० वर्षांनंतर कोकणात शिवसेनेला यश मिळालंय.
आंगणेवाडीत या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. यावेळी उद्धव ठाकरे हे दीपक केसरकर यांची ठाकरे भेट घेणार का? याकडे सगळ्याचे लक्ष लागलयं. काँग्रेस उमेदवार निलेश राणेंचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी समर्थक दीपक केसरकर आणि सहकाऱ्यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.