एका मिनिटात तणाव कमी करण्यासाठी या ५ टीप्स

धावपळीच्या युगात तणाव ही एक समस्या झाली आहे. या समस्येवर तुम्ही मात करु शकता. एका मिनिटात तणाव कमी करण्यासाठी काही सोप्या टीप्स आहेत.

Updated: Jan 14, 2016, 04:16 PM IST

मुंबई : चिंता किंवा तणाव आपल्या आरोग्यवर खूप परिणाम करते. धावपळीच्या युगात तणाव ही एक समस्या झाली आहे. या समस्येवर तुम्ही मात करु शकता. एका मिनिटात तणाव कमी करण्यासाठी काही सोप्या टीप्स आहेत.

अधिक वाचा : हे सात पदार्थ खाणे टाळा

तणावामुळे या समस्या घेरतात
आयुष्य धकाधकीचे झाल्यामुळे तणाव अपरिहार्य आहे. तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. अभ्यासात अडचणी येतात. थकवा वाटू लागतो. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम सुरू होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा येतो. संताप वाढतो. आरोग्य बिघडते. याशिवाय मानसिक आजारही घेरतात. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, ह्रदयासंबंधी लेख, लठ्ठपणा, अॅसिडीटी, अल्सर, केस झडणे आदी व्याधी मागे लागतात.

अधिक वाचा : डोकेदुखी दूर करण्याचे तीन घरगुती उपाय

अस्वस्थता, डोकेदुखी, अपस्मार, नाडीची गती वाढणं, छातीत दुखणं, हृदयविकार, श्‍वासाला अडथळा आल्यासारखं वाटणं किंवा श्वास जोरात चालणं, उच्च रक्‍तदाब, जिभेला कोरड पडणं, अपचन, अॅसिडिटी, मूत्राशयावरील नियंत्रण कमी होणं, कोलेस्टोरॉलचं प्रमाण वाढणे, पाठदुखी, पोटदुखी, उलटी होण्याची भावना, कंबरदुखी, हातापायांना गोळे येणं, रोग प्रतिकारकशक्‍ती कमी होणे आदी समस्या उद्धभतात.

तणाव वाढल्यास लोक मद्य, ड्रग्ज, धुम्रपान सेवन सुरू करतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटत असले तरी तणाव कायमस्वरूपी दूर होत नाही. शिवाय यामुळे आरोग्याच्या इतर समस्या सुरू होतात. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी जीवनपद्धती बदलण्याची गरज आहे. 

काय आहेत उपाय?

1. दीर्घ श्वास घ्या. तुम्ही आपल्या श्वासवर लक्ष केंद्रीत करा. तुमचे वाढलेले हृदयाचे ठोके कमी करण्यास दीर्घ श्वास मदत करतो. शरिरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. त्यामुळे मनाला शांतता वाढते. आपल्या शरीरातील स्नायूंवरील ताण कमी होण्यास मदत होते. नेहमी दीर्घ श्वास आत घेण्याची अंगी लावून घ्या. त्यामुळे याचा तणाव कमी होण्यास मदत होते.

२. मित्रांना फोन करा. मित्र-मैत्रीणींशी आणि आवडत्या व्यक्तींशी मनसोक्त गप्पा मारा. त्यामुळे मनावरील ताण कमी होतो.

३. स्वत:साठी थोडा वेळ काढून योगासने आणि हलका व्यायाम करा. कोणताही विचार न करता १५ ते २० मिनिटे डोळे बंद करून बसा.

४. वाचन, लेखन किंवा छंदासाठी थोडा वेळ काढा.  टीव्ही बघून किंवा संगीत ऐकून स्वतःची करमणूक करा. त्यामुळे मनाला थोडी विश्रांती मिळते. लक्ष त्याकडे केंद्रीत होते. त्यामुळे तणाव हलका होण्यास मदत होते.     

५. धावा किंवा जोरात चाला. तुम्हाला शारीरिक व्यायामाची गरज आहे. नियमित व्यायाम केल्याने शरीरावरील ताण कमी होतो. व्यायाम केल्याने आपल्या शरीराला ताजा ऑक्सिजन मिळतो. तुमचा मूड चांगला राहतो. त्यामुळे व्यायामावर भर द्या.