टीव्ही बघितल्याने होतंय आयुष्य कमी....

हल्ली कामावरून घरी आल्यावर अनेक मंडळी टीव्हीवरच्या सीरियल बघण्यात मग्न होऊन जातात; पण यापुढे तासन्तास टीव्ही बघण्याआधी नक्कीच तुम्ही विचार कराल.

Updated: Oct 17, 2012, 02:05 PM IST

www.24taas.com, मेलबर्न
हल्ली कामावरून घरी आल्यावर अनेक मंडळी टीव्हीवरच्या सीरियल बघण्यात मग्न होऊन जातात; पण यापुढे तासन्तास टीव्ही बघण्याआधी नक्कीच तुम्ही विचार कराल.
कारण नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातनं हे स्पष्ट झालं आहे की एक तास सलग टीव्ही पाहिल्याने माणसाचं आयुष्य २२ मिनिटांनी कमी होतं.
यामुळे एकंदरीत तुमच्या संपूर्ण आयुष्यातील साडेचार वर्ष कमी होतील. नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक आणि द ऑस्ट्रेलिया डायबिटीज, ओबेसिटी आणि लाईफस्टाईल यांनी केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढला आहे.