मुंबई : मीठ खाताना जरा जपून... असे सल्ले आपण अनेकदा ऐकतो. खाण्यात मीठाचं प्रमाण वाढलेलं असेल तर उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवतो, हे आपल्याला एव्हाना माहीत असेलच पण याच मीठामुळे तुमच्या हृदयालाही धोका आहे.
होय, अमेरिकेत केल्या गेलेल्या एका नव्या संशोधनात ही गोष्ट समोर आलीय. अधिक प्रमाणात मीठ खाण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींचा वेळेअगोदरच मृत्यू होतो, असं या शोधातून समोर आलंय. अमेरिकन सरकारच्या 'सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशन' (CDC)नं केलेल्या शोधात ही गोष्ट समोर आलीय.
उल्लेखनीय म्हणजे, फास्ट फूड आणि डब्बाबंद जेवणं खाणाऱ्या व्यक्तींना सामान्यांपेक्षा जास्त मीठ खाण्याची सवय असते, असंही यामध्ये नमूद करण्यात आलंय.
शोधानुसार, मीठ शरीराला इतकं हानीकारक आहे... की त्रास उद्भवल्यानंतर तुम्ही मीठ खाणं पूर्णपणे बंद केलं तरीदेखील तुमच्या शरीराची झालेली हानी भरून निघू शकत नाही.
मीठात सोडियम असतं... आणि सोडियमचं अधिक प्रमाण शरीरातील रक्तसंचाराची गती अधिक वाढवतं... आणि त्यामुळे हृद्यविकाराच्या धोक्याची शक्यता वाढते.
यामुळे, आता तुम्हाला समजलंच असेल की जेवणात मीठाचा योग्य प्रमाणात वापर करणं किती गरजेचं आहे... मग, वेळेवरच सावरा... आणि तुमच्या हृदयाची काळजी घ्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.