हळदीचे गुणधर्म

रोज एक ग्रॅम हळद सेवन केली तरी त्यामुळे स्मरणशक्ती वाढते, असे अलीकडच्या संशोधनात दिसून आले आहे. तसेच न्याहरीच्या वेळीच ही हळद घेणे आवश्यक असते, त्यामुळे मधुमेहाला आधीच्या अवस्थांमध्येच अटकाव होतो तसेच बोधनात्मक अडचणीही दूर होतात. 

Updated: Nov 27, 2014, 09:38 PM IST
हळदीचे गुणधर्म  title=

मुबंई : रोज एक ग्रॅम हळद सेवन केली तरी त्यामुळे स्मरणशक्ती वाढते, असे अलीकडच्या संशोधनात दिसून आले आहे. तसेच न्याहरीच्या वेळीच ही हळद घेणे आवश्यक असते, त्यामुळे मधुमेहाला आधीच्या अवस्थांमध्येच अटकाव होतो तसेच बोधनात्मक अडचणीही दूर होतात. 
जगात दिवसेंदिवस वयस्कर लोकसंख्या वाढत आहे, त्यात अनेकांना विसरभोळेपणाचा रोग जडलेला असतो. मोनाश विद्यापीठातील मार्क वालव्हिस्ट यांनी सांगितले की, हळद ही गुणकारी असून त्यामुळे अनेक आजार होण्याचे ओझे दूर होते. यात ६० वर्षे वयाच्या वृद्धांची तपासणी करण्यात आली. यात काहींना खोटय़ा गोळ्या देण्यात आल्या तर काहींना हळद देण्यात आली. त्यात ज्यांना हळद देण्यात आली त्यांची स्मरणशक्ती व इतर बोधनक्षमतेत फरक पडलेला दिसला. 
सुमारे सहातास वृद्ध व्यक्तींमध्ये हा परिणाम दिसून आला. हळद हा स्वयंपाकात वापरला जाणारा आशियातील एक नेहमीचा घटक आहे. त्यात क्युरक्युमिन हे द्रव्य असते, ते हळदीत ३ ते ६ टक्के असते त्यामुळे विसराळूपणा काहीसा कमी होतो. आशिया पॅसिफिक जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. मधुमेहाला अटकाव करण्यासही हळदीचा चांगला उपयोग होतो.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.