तांदळाचे हे आहेत अनेक फायदे

रोजच्या जेवणात भाताचे महत्त्व अधिक आहे. पोळी-भाजीसोबत भात हा खाल्ला जातोच. तांदूळ शिजवून भात केला जातो. मात्र ज्याप्रमाणे जेवणात भाताला महत्त्व आहे त्याचप्रमाणे तांदुळाचे अनेक फायदेही आहेत. 

Updated: Jul 25, 2016, 10:42 AM IST
तांदळाचे हे आहेत अनेक फायदे title=

मुंबई : रोजच्या जेवणात भाताचे महत्त्व अधिक आहे. पोळी-भाजीसोबत भात हा खाल्ला जातोच. तांदूळ शिजवून भात केला जातो. मात्र ज्याप्रमाणे जेवणात भाताला महत्त्व आहे त्याचप्रमाणे तांदुळाचे अनेक फायदेही आहेत. 

चेहऱ्यावरील डाग दूर होतात - चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी उपयोगी आहे तांदूळ. तांदूळ बारीक वाटून घ्या. वाटलेल्या तांदुळाच्या पिठीमध्ये थोडेसे पाणी मिसळून ही पेस्टर चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतात. 

डोकेदुखीसाठी फायदेशीर - डोकेदुखीचा त्रास होत असल्यास शिजलेल्या भाताच्या पाण्यात एक चिमूट सुंठ पावडर मिसळून डोक्यावर लावा. यामुळे डोकेदुखीपासून सुटका होते. 

जुलाबाचा त्रास होतो दूर - जुलाबाचा त्रास होत असल्यास तांदूळ बारीक वाटून घेऊन ते पाण्यात उकळवा. यात मीठ टाकून ही पेज प्या. यामुळे जुलाबाचा त्रास कमी होतो. 

सतत तहान लागणे - सतत तहान लागत असेल तर तांदुळाचे दाणे दिवसातून दोन-तीन वेळा चावून चावून खा. यामुळे तहान लागणे कमी होते.