सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

सकाळी लवकर उठणे ही जशी चांगली सवय आहे. तसेच सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे खूप फायदे आहे. सकाळी पाणी पिण्यामुळे आरोग्य एकदम चांगले राहते तसेच दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होते.

Updated: Oct 1, 2015, 11:12 PM IST
सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे हे आहेत फायदे title=

मुंबई : सकाळी लवकर उठणे ही जशी चांगली सवय आहे. तसेच सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे खूप फायदे आहे. सकाळी पाणी पिण्यामुळे आरोग्य एकदम चांगले राहते तसेच दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होते.

सकाळी उठल्यानंतर चार ते पाच ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र, तुम्हाला सवय नसेल तर किमान दोन ग्लास पाणी अवश्य प्या. त्यानंतर हे प्रमाण वाढवा. पाणी पियाल्यामुळे आपला रक्तप्रवाह चांगला राहतो.

१. सकाळी पाणी पिल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो. त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते आणि चमकायला लागते.

२. सकाळी पाणी पिल्यामुळे नवीन पेशींना चालना मिळते. तसेच आपले स्नायू अधिक मजबुत होण्यास मदत होते.

३. सकाळी पाणी पिण्यामुळे चयापचय सुरु होते. तसेच आपला स्थुलपणा कमी होण्यास मदत होते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सकाळी जितक्या लवक उठता येईल तेवढे उठा आणि भरपूर पाणी प्या.

४. जे लोक सकाळी उपाशीपोटी पाणी पितात त्यांना कप होत नाही. सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे जे खाल्ले जाते त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. कप दूर झाल्याने अन्य आराजही पळून जातात.

५. सकाळी पाणी पिल्यामुळे गळा, डोळे, लघवी, किडनी बाबत ज्याकाही समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.