रात्रीच्या वेळी या 6 गोष्टी करा, लवकर कमी होईल वाढलेलं पोट

आजकाल लठ्ठपणा ही समस्या सामान्य झालीय. तुम्ही अनेक महिन्यांपासून आपल्या पोटाची चरबी कमी करण्याचा प्रयत्न करताय, पण यश मिळत नसेल तर काही नियमांचं पालन करा. आज आम्ही आपल्याला असे साधे नियम सांगणार आहोत, दररोज रात्री ते नियम पाळल्यास आपलं वजन कमी होण्यास मदत होईल.

Updated: Aug 1, 2016, 11:14 PM IST
रात्रीच्या वेळी या 6 गोष्टी करा, लवकर कमी होईल वाढलेलं पोट title=

मुंबई: आजकाल लठ्ठपणा ही समस्या सामान्य झालीय. तुम्ही अनेक महिन्यांपासून आपल्या पोटाची चरबी कमी करण्याचा प्रयत्न करताय, पण यश मिळत नसेल तर काही नियमांचं पालन करा. आज आम्ही आपल्याला असे साधे नियम सांगणार आहोत, दररोज रात्री ते नियम पाळल्यास आपलं वजन कमी होण्यास मदत होईल.

1. ग्रीन टी प्यावे
रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यानं शरीराची पचनक्रिया वाढते. ज्यामुळं आपलं वजन कमी होण्यास मदत होते.

2. साखर आणि स्टार्च असलेले पदार्थ न खाणे
साखर आणि ज्यात स्टार्च कार्ब्स असतात, जे की इन्सुलिन निघण्याच्या प्रक्रियेला उत्तेजित करतात. इन्सुलिन शरीरातील फॅट स्टोरेज हार्मोन असतं. जेव्हा इन्सुलिनची मात्रा कमी असते, तेव्हा शरीरात जमा झालेलं फॅट बर्न व्हायला सुरूवात होते, म्हणून रात्री साखर आणि स्टार्च असलेले पदार्थ उदा. बटाटा खाऊ नये.

3. मिर्ची खाणे
वैज्ञानिकांच्या अभ्यासानंतर ही माहिती मिळालीय की, लठ्ठपणा कमी करण्यासाठी मिर्ची खावी. तज्ज्ञांच्या मते झोपण्यापूर्वी मिर्ची खायला हवी. त्यामुळं वजन कमी होण्याची प्रक्रिया सुरू राहते.

4. झोप पूर्ण करा
पूर्ण झोप झाली नाही तर वजन वाढतं. झोपण्यापूर्वी काही वेळ शांतपणे ध्यान करावं, आनंद देणारं संगीत ऐकावं, गरम पाण्यानं आंघोळ करावी. त्यामुळं चांगली झोप लागते. झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त फॅट बर्न होतं. झोपल्यानं शरीरातील हार्मोन कंट्रोल असतात, त्यामुळं सतत भूख लागत नाही आणि शरीरातील उर्जाही कमी होत नाही.

5. जंक फूड
रात्री जंक फूड जसं पिझ्झा, पास्ता, बर्गर इत्यादी खाणं बिल्कुल बंद करा. सोबतच शक्य असेल तर रात्री कोल्डड्रिंक आणि तळलेले पदार्थ खाऊ नये. याचं कारण रात्रीच्यावेळी आपली पचनक्रिया हळू काम करते. त्यामुळं जास्त फॅट बर्न होत नाही आणि लठ्ठपणा वाढतो.

6. गरम पाणी प्यावे
रात्री झोपण्यापूर्वी थंड पाणी नाही तर गरम, कोमट पाणी प्यावं. यामुळं पोटाच्या समस्या बंद होतात आणि जास्तीचं फॅट बर्न होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.