सू सू रोखल्याने होतात हे ५ नुकसान

 जितके जास्त वेळ तुम्ही युरीन रोखून धरतात, त्यामुळे तुमचा ब्लॅडर बॅक्टरीयाला अधिक विकसीत करतो. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जाणून घ्या सू सू रोखल्याने आपल्या किती नुकसान होऊ शकते. 

Updated: Jul 12, 2016, 11:17 PM IST
 सू सू रोखल्याने होतात हे ५ नुकसान  title=

मुंबई :  जितके जास्त वेळ तुम्ही युरीन रोखून धरतात, त्यामुळे तुमचा ब्लॅडर बॅक्टरीयाला अधिक विकसीत करतो. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जाणून घ्या सू सू रोखल्याने आपल्या किती नुकसान होऊ शकते. 

१) लघवी रोखणे 
लघवी करणे ही शरिराची एक सामान्य प्रक्रिया आहे, जी लागल्यावर पुढील एक दोन मिनिटात विसर्जीत करणे चांगली गोष्ट असते. सामान्यपणे ब्लॅडर भरल्याने स्वतः प्रतिक्रिया तंत्र तुमच्या मेंदूत वॉशरूमला जाण्याचे संकेत देतो. घामाप्रमाणे लघवीच्या माध्यमातून शरिरातील अनावश्यक तत्व बाहेर पडतात. ते शरिरात जास्त वेळ राहिले तर संक्रमण होण्यास सुरू होते. 

२) लघवी रोखणे योग्य आहे का? 
काही लोक लघवीला काही मिनिटांपासून बराच काळापर्यंत रोखून ठेवतात. तुम्ही युरिन कितीवेळ रोखून धऱतात हे युरीन किती तयार झाली यावर अवलंबून असते. तसेच हायड्रेशनची स्थिती, पातळ पदार्थ आणि ब्लॅडरची कार्यक्षमता यावर अवलंबून असते. पण लवघी रोखून धरणारे आपल्या लघवी लागली आहे ही आपली क्षमता गमवून बसतात. जितके जास्त वेळ तुम्ही तुमची लघवी रोखून घरतात. तितके बॅक्टेरिया अधिक विकसीत होण्याची शक्यता जास्त असते. 

३) किडनी स्टोन 
लघवी एक किंवा दोन तास रोखून धरल्याने महिला आणि काम करणाऱ्या युवकांना युरीन संबधी समस्यांना सामोरे जावे लागले. त्याची सुरूवात मुत्राशयात दुखण्यापासून होते. ८ ते १० तास बसून काम करणाऱ्या व्यक्तीना लघवी लागली आहे हे त्यांनी कामाची जागा बदलली तेव्हा लक्षात येते. या दरम्यान किडनीमधून मुत्राशयाच्या ब्लॅडरमध्ये लघवी जमा होते. प्रत्येक मिनिटात दोन एमएल युरीन ब्लॅडरमध्ये पोहचते. त्यामुळे एक दोन तासातच लघवी करणे योग्य असते. तीन ते चार मिनिटाच्या उशीरानंतर पुन्हा लघवी किडनीकडे जाते. त्यामुळे किडनी स्टोन होण्यास सुरूवात होते. लघवीत युरीया आणि अमिनो अॅसीड सारखे टॉक्सिक तत्व असतात. 

४) युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शन 
कधीही जोरात आलेली लघवी रोखू नका, जेव्हा लघवी लागल्याचे वाटले तेव्हा लगेच तीला विसर्जित करा, नाही तर यूटीआय होण्याचा धोका असतो. युरीन रोखून धरल्याने संक्रमण होण्याचा (इन्फेक्शन) धोका असतो. युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे मूत्र मार्गात संक्रमण महिलांना होणारा आजार आहे. त्याला यूटीआय म्हणतात. मूत्र मार्ग संक्रमण जीवाणू जन्य संक्रमण आहे, त्याने कोणताही भाग प्रभावीत होऊ शकतो. मूत्रमार्गातील इन्फेक्शन हे किडनीतही प्रवेश करू शकतात. 

५) किडनी फेल्युअर 
किडनी फेल्युअर एक मेडिकल समस्या आहे. किडनीत अचानक रक्त आणि टाकाऊ पदार्थ आणि अवशेषांना फिल्टर करण्याची क्षमता बंद पडते. युरीन संबंधी सर्व प्रकारचे इन्फेक्शन हे किडनीवर वाईट परिणाम टाकू शकतात. शरिरात युरिया आणि क्रियाटीनीन दोन घटन जास्त वाढल्यास युरून सोबत ते बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे रक्ताचे प्रमाणे वाढते. भूक कमी लागणे, उल्टी येणे, अशक्तपणा वाढणे, थकणे, नेहमी पेक्षा कमी लघवी होणे ही किडनी फेल होण्याची लक्षणे आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.