उन्हापासून स्वत:चा बचाव कसा कराल?

पारा चढला म्हणून घराबाहेर न पडणे हा त्यावरील उपाय तर होऊ शकत नाही, तेव्हा या वाढत्या उन्हाचा, उका़ड्याचा सामना कसा करावा, काय काळजी घ्यावी, यावर एक हा रिपोर्ट.

Updated: May 28, 2015, 12:07 PM IST
उन्हापासून स्वत:चा बचाव कसा कराल? title=

मुंबई : पारा चढला म्हणून घराबाहेर न पडणे हा त्यावरील उपाय तर होऊ शकत नाही, तेव्हा या वाढत्या उन्हाचा, उका़ड्याचा सामना कसा करावा, काय काळजी घ्यावी, यावर एक हा रिपोर्ट.

सूर्यदेव कोपल्यामुळे  बळींचा संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिवसा घराबाहेर पडणं मुश्कील झालं असलं तरी लोकांना कामानिमित्त घराबाहेर पडण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे उन्हापासून स्वत:चा बचाव करणे हाच एकमेव मार्ग उरला आहे.

कसा कराल उन्हाळ्याचा सामना 
> घराबाहेर पडतांना शक्यतो उपाशीपोटी घराबाहेर पडू नका. कारण उन्हामुळे त्रास होण्याची शक्यता असते.

> घराबाहेर जातांना पाण्याची बाटली सतत जवळ ठेवा. कारण उन्हामुळे शरीरातील पाण्याची मात्र कमी होते. त्यामुळे सतत पाणी पित राहा.

उन्हात बाहेर गरम हवा वहात असते. त्यापासून शरीराचं रक्षण करण्यासाठी चेहरा सुती कपड्याने झाका.

घराबाहेरुन उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी घेऊ नका. कारण त्याचा शऱीरावर परिणाम होण्याची शक्यता असते.

घराबाहेर गेल्यानंतर उघड्यावर विकले जाणारे पदार्थ खाऊ नका.

एसीतून थेट उन्हात जाऊ नका. तर एसीतून बाहेर पडल्यानंतर थोडावेळ सामान्य वातावरणात काही वेळ घालवल्यानंतर घराबाहेर पडा. 

उन्हाळ्यात शक्यतो सुती कपड्यांचा वापर करा. त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.

बाहेर जातांना गॉगल, टोपी आणि रुमाल वापरा. कारण त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळांपासून डोळ्यांचं संरक्षण होते.

ऊन्हाळ्यात भरपेट जेवण करु नका. भूकेपेक्षा थोडं कमी जेवण करा. 

उन्हाळ्यात तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाऊ नका. त्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. 

उन्हाळ्यात शक्यतो शिळे अन्न खाऊ नका. घरातील उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवा. 

दररोज आहारात दही आणि ताकाचा समावेश असावा तसेच लिंबू पाणी आणि नारळ पाणी घ्या. ते उन्हाळ्यात शरिरासाठी फायदेशीर आहे.

टरबूज, खरबूज आणि काकडी ही उन्हाळ्यात मिळणारी फळे घ्या. ही काळजी घेतल्यास त्याचा फायदा होईल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.