ऑफिसमध्ये जेवताना ही घ्या काळजी

मुंबई : आपण ऑफिसमध्ये गेल्यावर आपल्या कामात इतके गुंग होतो की आपल्या खाण्यापिण्याकडेही आपलं लक्ष राहात नाही. 

Updated: Mar 16, 2016, 04:49 PM IST
ऑफिसमध्ये जेवताना ही घ्या काळजी  title=

मुंबई : आपण ऑफिसमध्ये गेल्यावर आपल्या कामात इतके गुंग होतो की आपल्या खाण्यापिण्याकडेही आपलं लक्ष राहात नाही. ज्या पोटासाठी आपण पैसे कमवतो त्या पोटावरच आपण नकळतपणे अन्याय करत असतो. बरेचदा काही जण तर कामाच्या नादात चक्क जेवायलाच विसरतात. पण, याचे तुमच्या आरोग्यावर काही गंभीर परिणाम होतात. म्हणून खाण्याच्या काही सवयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

नीट चावून खा 
जेवताना तुम्ही सरळ बसलेले आहेत याची खात्री करा. तुमच्या कामाच्या टेबलवर कसेही अघळपघळपणे बसू नका. प्रत्येक घास नीट चावा. उगाच जेवणाची घाई करू नका. जास्त चावल्याने जेवणातील जास्तीत जास्त घटक तुमच्या शरीराला मिळतात. नीट न चावता खालेल्या अन्नाचे मोठे घटक तुमच्या शरीराच्या आंतरिक भागांत अडकतात. त्याचे तुमच्या तब्येतीवर दुष्परिणाम होऊ शकतात. 

जेवताना घाई करू नका 
तुम्ही तुमचे जेवण घेताना घाई केली तर त्याचे काही घातक परिणाम तुमच्या शरीरावर होतात. घाईघाईत जेवण्याची वेळ आल्यास आपण काही असे पदार्थ खातो ज्यांत मोठ्या प्रमाणावर शर्करा आणि फॅट्स असतात. हे पदार्थ तब्येतीसाठी अपायकारक असतात. काही वेळा यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाणात अचानकपणे कमी जास्त होऊ शकते. तुम्ही अशा प्रकारचा आहार घेत असाल तर शरीरातील साखर कमी झाल्यास एखादे चॉकलेट तोंडात टाका. 

जेवताना कॅलरीजचे द्रव स्वरुपात सेवन करू नका
जेवताना फळांचे ज्यूस पिऊ नका. त्यांत मोठ्या प्रमाणावर शुगर असते. जेवताना कोणतेही कोल्ड ड्रिंक पिऊ नका. फक्त आणि फक्त पाणीच प्या. पण, जेवणाच्या पाच मिनिटे आधी किंवा पाच मिनिटे नंतर पाणी प्या. जेवताना पाणी पिणे टाळा. यामुळे तुमची पचनाची क्रिया मंदावू शकते. 

कोणत्याही स्क्रीनसमोर खाऊ नका 
आजवर झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की संगणकाच्या किंवा टेलिव्हिजनच्या स्क्रीनसमोर बसून खाल्ल्याने आपण जास्त कॅलरीजचे सेवन करतो. त्यामुळे डॉक्टरांच्या मते तुम्ही निदान २० मिनिटांचा लंच ब्रेक घ्या. त्यात इतर कोणतेही काम करू नका. 

कामाच्या ठिकाणी काहीतरी हेल्दी खा 
तुमचा नाश्ता आणि तुमचा लंच ब्रेक यांच्या मधल्या वेळात तुम्ही ज्या ठिकाणी कामाला बसता तिथे थोडे काहीतरी खा. यामुळे तुम्हाला भरपूर भूक लागणार नाही. यात बदाम किंवा एखादे सफरचंद चांगला पर्याय ठरू शकतो. 

सकाळी कॉफी पिऊ नका 
सकाळी सकाळी कॉफी घेतल्याने त्यातील कॅफेन तुमच्या शरीराकडून जास्तीत जास्त साखरेची मागणी करते. त्यामुळे तुम्ही नकळतपणे जास्तीत जास्त साखर असणारे पदार्थ खाता. त्यामुळे दिवसभरात एकदाच कॉफी प्या. ग्रीन टी सुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो.