केसगळतीवर फायदेशीर आहे कलौंजीचे तेल

आपल्या किचनमध्ये असे अनेक पदार्थ असतात जे केवळ पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठीच नव्हे तर त्यात औषधी गुणधर्मही असतात. यापैकीच एक म्हणजे. कलौंजी. 

Updated: Aug 22, 2016, 03:43 PM IST
केसगळतीवर फायदेशीर आहे कलौंजीचे तेल title=

मुंबई : आपल्या किचनमध्ये असे अनेक पदार्थ असतात जे केवळ पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठीच नव्हे तर त्यात औषधी गुणधर्मही असतात. यापैकीच एक म्हणजे. कलौंजी. 

कलौंजीच्या बियांचा उपयोग लोणच्याचा स्वाद वाढवण्यासाठी केला जातो. कलौंजीच्या बीमध्ये औषधी गुणधर्म असतात. तसेच केसगळतीवर सर्वात उत्तम आहे कलौंजीचे तेल. केसगळती रोखायची असल्यास कलौंजीच्या तेलाचा वापर केल्यास फायदा होतो.

यासाठी एक चमचा कलौंजीच्या तेलात दोन चमचे कस्टर्ड ऑईल आणि बदामाचे तेल मिसळा. या मिश्रणाने केसांच्या मुळांशी मसाज करा. काही दिवसांतच तुमची केसगळती थांबेल

केवळ केसगळती रोखण्यासाठीच नव्हे तर डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठीही कलौंजीच्या तेलाचा वापर होतो. चहामध्ये कलौंजीचे तेल टाकून प्यायल्यास डायबिटीस रुग्णांची शुगर नियंत्रणात राहते.