वेदनाशामक गोळ्यांचा किडनीला धोका...

वेदनाशामक गोळ्या म्हणजे पेन किलरची विक्री बाजारात जास्त प्रमाणात आहे.

Updated: May 2, 2014, 03:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वेदनाशामक गोळ्या म्हणजे पेन किलरची विक्री बाजारात जास्त प्रमाणात आहे. अनेक व्यक्ती अतिशय साध्या दुखण्यावर देखील वेदनाशामक गोळ्या घेत राहतात. पण जास्त वेदनाशामक गोळ्या घेतल्याने मुत्रपिंडावर म्हणजे किडनीवर त्याचा विपरित परिणाम होतो. या कारणानेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेणं टाळलं पाहिजे.
वेदनाशामक गोळ्यांचा त्रास हा सरळपणे मुत्रपिंडावर होतो. या कारणाने आपले दुखणे डॉक्टरांकडे दाखवून त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या घ्याव्यात. तसेच या गोळ्या जेवल्यानंतर किंवा काही तरी खाऊनच घ्याव्या. जर असं केलं नाही तर, गोळ्यांचा परीणाम मूत्रपिंड आणि वर होऊ शकतो. वेदना होत नसताना अधिक काळ या गोळ्या घेतल्यास पोट बिघडणे, तसेच रक्तस्त्राव आणि हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम, असे त्रास उद्भवतात.
खूप वेदना होत असल्यास डॉक्टरांकडे जाण्याच्या वेळेपुरते आराम पडावा यासाठीच त्याचा उपयोग करावा. तसेच वेदानाशामक गोळ्या स्वत:च्या मर्जीनुसार न घेता, आधी डॉक्टरांचा सल्ला घेताल तर मुत्रपिंडाचे आजार होण्यापासून आपण वाचू शकतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.