'ऑनलाईन गर्भपात' म्हणजे जीवाला घात!

इंटरनेट हे जर वरदान ठरतंय तसंच त्याचा चुकीचा वापर केल्यास ते शापही ठरतं... इंटरनेटमुळे सगळं जगचं तुमच्यासमोर एका क्लिकमध्ये उभं राहतं... तंत्रज्ञानात विकास होत असला तर सावधान राहणं गरजेचं आहे, असं डॉक्टर आवाहन करताना दिसत आहेत. याचं कारण म्हणजे, पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली मुली लग्नापूर्वीच गर्भवती झाल्यानं यातून सुटका करून घेण्यासाठी त्या इंटरनेटवर गर्भपातासाठी औषधं शोधून घेतात... आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत:च गर्भपात करून घेतात. मात्र, हा प्रयत्न त्यांच्या जीवासाठी धोकादायक आहे. 

Updated: Dec 31, 2014, 05:45 PM IST
'ऑनलाईन गर्भपात' म्हणजे जीवाला घात! title=

नवी दिल्ली : इंटरनेट हे जर वरदान ठरतंय तसंच त्याचा चुकीचा वापर केल्यास ते शापही ठरतं... इंटरनेटमुळे सगळं जगचं तुमच्यासमोर एका क्लिकमध्ये उभं राहतं... तंत्रज्ञानात विकास होत असला तर सावधान राहणं गरजेचं आहे, असं डॉक्टर आवाहन करताना दिसत आहेत. याचं कारण म्हणजे, पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली मुली लग्नापूर्वीच गर्भवती झाल्यानं यातून सुटका करून घेण्यासाठी त्या इंटरनेटवर गर्भपातासाठी औषधं शोधून घेतात... आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत:च गर्भपात करून घेतात. मात्र, हा प्रयत्न त्यांच्या जीवासाठी धोकादायक आहे. 

इंटरनेटवरून अर्धवट माहिती घेऊन, ओरल पिल्सद्वारे गर्भपात करून घेणं एका मुलीला खूप सोप्पं वाटलं... तिनं मेडिकल दुकानातून औषधं विकत घेतली आणि डॉक्टरच्या सल्ल्याविना त्या गोळ्या घेतल्या. औषधांचा दुसरा डोस घेताच तिला मोठ्या प्रमाणात ब्लिडिंग सुरू झालं. बराच वेळ रक्त गेल्यानं ती काही वेळातच अशक्त पडली. तिची तब्येत खूपच खराब झाल्यामुळे तिला डॉक्टरांकडे जावं लागलं... आणि ही घटना उघड झाली. 

त्यानंतर तिच्या गर्भाशयातून मृत बालकाचे अवशेष बाहेर काढण्यात आले. डॉक्टरांचा सल्ला न घेताच घेतलेल्या औषधांमुळे तिचा पूर्ण गर्भपात झाला नव्हता. इन्फेक्शनही झालं होतं... वेळीच डॉक्टरांकडे गेल्यामुळे तिचा जीव वाचला अन्यथा... 

ही एका मुलीची गोष्ट नव्हे... आजकाल अनेक तरुणींसाठी गर्भपात करून घेणं ही सामान्य गोष्ट आहे... पण, ही सामान्य वाटणारी गोष्ट कधी कधी त्यांच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकते. इंटरनेटच्या माध्यमातून गर्भपात होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येतायत आणि तरुणी यामध्ये अडकताना दिसतायत. 

औषधांनी गर्भपात करणं अवैध नाही. या प्रक्रियेला स्वास्थ्य मंत्रालयानं 2002 मध्ये कायदेशीर मान्यता दिलीय. मेडिकल अॅबॉर्शन निर्देशांनुसार, गर्भावस्थे दरम्यान सात आठवड्यांच्या आत औषधांद्वारे गर्भपात शक्य आहे. म्हणजे, मासिक पाळीच्या तीन आठवड्यांमध्ये माइफप्रोस्टिन आणि मीसोप्रोसटल अॅबॉर्शन पिल घेतल्या जाऊ शकतात. परंतु, ही औषधंदेखील डॉक्टरांच्या देखरेखीखालीच घेतली जायला हवीत. कारण, गर्भपातानंतर डॉक्टर अल्ट्रासाऊंड द्वारे पुन्हा एकदा तपासतात की गर्भपात व्यवस्थित पार पडलाय किंवा नाही... त्यामुळे, स्त्रियांच्या गर्भात कोणताही अवशेष उरला जात नाही. 

अंदाजे, एका वर्षात 18 लाख 67 लाख गर्भपात स्वत: केलेल्या मेडिकल अॅबॉर्शनद्वारे होतात. इंटरनेटच्या मदतीनं केले गेलेले अॅबॉर्शन धोकादायक ठरू शकतात. यामुळे, ब्लिडींग, अर्धवट गर्भपात, डी आणि सी जीवनसत्वाची कमतरता, रक्तात संक्रमण, आघात तसंच मृत्यू अशा अनेक धोकादायक परिस्थिती उद्भवू शकतात. 

उल्लेखनीय म्हणजे, राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशननुसार महिला मृत्यू दरात प्रतिवर्षी आठ टक्के मृत्यू दर (अर्थात 4600 मृत्यू) गर्भपातामुळे होतात. मेडिकल अॅबॉर्शन गर्भपातासाठी सहज सोपी प्रक्रिया आहे... पण, ती नेहमीच डॉक्टरांच्या देखरेखीखाली केली जाणं आवश्यक आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.