पाहा उन्हाळ्यात असं वाचाल केसगळतीपासून!

उन्हाळ्यामध्ये केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. तज्ज्ञांच्या मते, खोबरेल तेल डोक्याला लावून केसांच्या मूळाशी वेळोवेळी मसाज करायला हवी. तसंच कमकुवत आणि पातळ झालेले केस खालून कापणं ही उपयुक्त ठरेल.

Updated: Apr 29, 2015, 03:33 PM IST
पाहा उन्हाळ्यात असं वाचाल केसगळतीपासून! title=

नवी दिल्ली: उन्हाळ्यामध्ये केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. तज्ज्ञांच्या मते, खोबरेल तेल डोक्याला लावून केसांच्या मूळाशी वेळोवेळी मसाज करायला हवी. तसंच कमकुवत आणि पातळ झालेले केस खालून कापणं ही उपयुक्त ठरेल.

उन्हाळ्यात स्वत:ला फ्रेश ठेवण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारणं सर्वोत्तम असं अनेकांना वाटतं. पण ते हे विसरतात की, स्विमिंग पूलच्या पाण्यात क्लोरिन असतं आणि ते केसांसाठी घातक ठरतं. म्हणून जर आपण स्विमिंग पूलमध्ये जाणार असाल त्याआधी केसांना भरपूर तेल लावावं किंवा कंडिशनर लावून मगच पूलमध्ये उतरावं.

पूलमध्ये आंघोळ केल्यानंतर साध्या पाण्यानं केसांना धुवावं, शॅम्पू लावू नये. जर आपण रेग्युलर स्विमर असाल तर हेअर स्पा करणं केसांसाठी फायदेशीर ठरू शकतं. ज्या लोकांच्या डोक्याची त्वचा तेलकट होते. तरीही तुम्हाला कंडिशनर लावायचं असेल तर ते पाणी युक्त कंडिशनर लावावं. यामुळं तुमचे केस सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सुरक्षित राहील आणि उन्हाळ्यात तेलकटपणाही कमी होईल.

केसांमधील अतिरिक्त तेल घालवायचं असेल तर तुम्ही लिंबाच्या रसानंही केस धुवू शकता. केसांमध्ये अस्ट्रीजेंटची फवारणी करून कंगव्यानं केस विंचरल्यानं ते ताजे आणि चमकदार दिसतील. केस नीरस आणि अनाकर्षक होण्याची समस्या तशी तर हिवाळ्यात होते. मात्र उन्हाळ्यात ही समस्या वाढते कारण लोक अधिक काळ एअर कंडिशनरमध्ये राहतात. याचा परिणाम म्हणजे केसांमधील ओलावा नष्ट होतो आणि ते कोरडे आणि कमकुवत होतात. या समस्येपासून बचाव करण्यासाठी केसांमध्ये सिरम लावून केस विंचरावेत आणि तेल मसाज केल्यानंतर वाफ घ्यावी.

कोरड्या, रखरखीत केसांपासून सुटका करण्यासाठी खोबरेल तेलानं त्यांना मसाज करावी. उन्हाळ्यात केसांना कपड्यानं, मोठी टोपी घालून झाकावं. जर आपण उन्हात खूप वेळ राहणार असाल तर घरी येऊन थंड्यापाण्यानं आंघोळ करावी. रंगवलेल्या केसांना तसंही गरम पाण्यानं धुवू नये. यामुळं केसांची चमक जाते. शिवाय रंगवलेल्या केसांना हेअर सनस्क्रीन लावू शकता. 

तर चिपचिप्या केसांमुळं त्रस्त असलेल्या लोकांनी नेहमी ड्राय शॅम्पूचा वापर करावा. जर आपण केसांची अधिक काळजी घेऊ इच्छित असाल तर आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा अंड्याच्या पांढऱ्या बल्क आणि लिंबाचा रस एकत्र करून लावावं आणि वंतर केस धुवावेत. याशिवाय उन्हाळ्यात शिकाकाईचाही वापर करू शकतो.

केस अनेक कारणांनी पातळ होतात. पातळ केसांची काळजी घ्यायची असेल तर वेळोवेळी केस खालून कापणं गरजेचं आहे. यामुळं आपल्या केसांचं व्हॉल्यूम वाढतं आणि दोन तोंडी केसांपासून सुटका होते. 
पातळ केस विंचरण्यासाठी नरम दातांचा कंगवा वापरावा. शॅम्पूनंतर केसांना जोरानं झटकू, पुसू नये.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.