हाय मिरची... ओह मिरची... बहुगुणकारी मिरची!

तिखट खाणाऱ्यांच्या जेवणात हिरवी मिरची नसेल तर थोडं चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं... होय ना! हीच हिरवी मिरची जेवणाची लज्जत वाढवण्यातही मदत करते इतकंच नाही तर डीश सजवतानाही हिरवी मिरची उठून दिसते. 

Updated: Jul 8, 2015, 03:13 PM IST
हाय मिरची... ओह मिरची... बहुगुणकारी मिरची! title=

मुंबई : तिखट खाणाऱ्यांच्या जेवणात हिरवी मिरची नसेल तर थोडं चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं... होय ना! हीच हिरवी मिरची जेवणाची लज्जत वाढवण्यातही मदत करते इतकंच नाही तर डीश सजवतानाही हिरवी मिरची उठून दिसते. 

पण, हिरव्या मिरचीचे इतकेच फायदे आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात... पाहा, हिरव्या मिरचीचे तुम्ही आत्तापर्यंत खचितच ऐकलेले फायदे... 

# हिरव्या मिरचीमध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं. इतर विटॅमिन्सचा शरीरात योग्य प्रकारे वापर करण्यासाठी विटॅमिन सी मदत करते. 

# हिरवी मिरची अॅन्ट-ऑक्सिडेंटचा एक योग्य पर्याय आहे.

# हिरव्या मिरचीत डायट्री फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीतरित्या सुरू राहते. 

# मिरचीत 'विटॅमिन ए' आढळतं. यामुळे डोळे आणि त्वचेलाही त्याचा फायदा होतो.

# नुकत्याच झालेल्या काही संशोधनांनुसार, हिरवी मिरची ब्लड शुगरलाही कमी करण्यात मदत करते. 

# हिरव्या मिरचीत Capsaicin नावाचं एक तत्व आढळतं... हे प्रोस्ट्रेट कॅन्सरपासून बचावासाठी महत्त्वपूर्ण ठरतं.

# हिरव्या मिरचीमुळे त्वचा साफ राहते. त्यामुळे, पिंपल्सपासून दूर राहण्यास मदत होते. 

# कॅन्सरपासून बचावासाठी हिरव्या मिरचीचा वापर उपयोगी ठरतो. परंतु, हे अजून तरी सिद्ध झालेलं नाही.

# हिरव्या मिरचीत अॅन्टी-बॅक्टेरियल गुण असतात. ज्यामुळे शरीर बॅक्टेरिया फ्री राहतं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.