पाणी... तुमच्या किडनीची काळजी घेण्याचा सर्वात सोप्पा उपाय!

 आज आहे वर्ल्ड किडनी डे. जगभरात किडनीच्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये या आजाराविषयी माहिती पोहचविण्यासाठी १२ मार्च हा दिवस 'किडनी दिवस' म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या किडनी डेचा संदेश आहे 'एक ग्लास पाणी तुम्ही प्या आणि एक ग्लास पाणी दुसऱ्याला प्यायला द्या...

Updated: Mar 12, 2015, 10:43 AM IST
पाणी... तुमच्या किडनीची काळजी घेण्याचा सर्वात सोप्पा उपाय! title=

मुंबई : आज आहे वर्ल्ड किडनी डे. जगभरात किडनीच्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये या आजाराविषयी माहिती पोहचविण्यासाठी १२ मार्च हा दिवस 'किडनी दिवस' म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या किडनी डेचा संदेश आहे 'एक ग्लास पाणी तुम्ही प्या आणि एक ग्लास पाणी दुसऱ्याला प्यायला द्या...

भारतात दरवर्षी सुमारे २ लाख ३० हजार जणांची किडनी फेल होते तर सध्या देशात सुमारे १५ लाख किडनीचे रूग्ण आहेत. या सर्वांना डायलिसिसची गरज आहे. परंतु यातील केवळ दहा टक्के रुग्णांनाच डायलिसिस घेणं आर्थिकदृष्टया परवडते. किडनी फेल झाल्यानंतर डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण असे दोनच उपाय आहेत. हे दोन्ही उपाय न केल्यास मृत्यू निश्चित आहे. त्यामुळं आपली किडनी निरोगी कशी राहील हे पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे.

डायबिटीज आणि हाय बीपी असणाऱ्यांमध्ये किडनी फेल होण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळं शुगर आणि बीपी कंट्रोलमध्ये ठेवणं सर्वाधिक गरजेचे आहे. किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्यांनीही विशेष काळजी घेणं गरजेचे आहे. दारू, स्मोकींगचे व्यसन, तसंच जास्त प्रमाणात पेन किलर घेणे किडनीसाठी धोकादायक आहे. 

किडनीचा आजार टाळण्यासाठी डायबिटीज आणि हाय बीपी रूग्णांनी वर्षातून एकदा किडनी चेक करून घेणं गरजेचे आहे. भरपूर पाणी पिणे, पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन करणे. हेल्थ चेकअपवेळी किडनीचीही तपासणी करावी.  

इतर कोणत्याही आजाराचे निदान लागू शकते. पण किडनी आजार तात्काळ लक्षात येत नाही. कारण किडनी कधी दुखत नाही. त्यामुळं ती चेक केल्यानंतर आजार कळू शकतो. किडनी प्रत्यारोपण फार कमी प्रमाणात होत असल्यानं याबाबत जनजागृती होणं गरजेचे आहे. एकट्या मुंबईत किडनी प्रत्यारोपणच्या प्रतिक्षा यादीत तब्बल अडीच हजार जण आहेत, अशी माहिती नेफ्रोलॉजिस्ट ऋषी देशपांडे यांनी दिलीय.  

देशामध्ये किडनीचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. परंतु त्याप्रमाणात अजूनही डायलिसिस सेंटर नाहीत. तसंच त्याचा खर्चही सामान्यांना न परवडणारा आहे. त्यामुळं किडनीचा आजार होवू न देण्यासाठी प्रयत्नशील  राहणं हेच कधीही चांगलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.