सियाचीनमध्ये हिमस्खलनात १० जवान शहीद

सियाचीन ग्लेशिअर स्थित एका सैन्याच्या चौकी गुरुवारी हिमस्खलनात बर्फाखाली गाडली गेली. यावेळी या चौकीत उपस्थित असलेले १० जवान शहीद झाल्याचं आता जाहीर करण्यात आलंय. 

Updated: Feb 4, 2016, 10:56 PM IST
सियाचीनमध्ये हिमस्खलनात १० जवान शहीद title=

जम्मू / नवी दिल्ली : सियाचीन ग्लेशिअर स्थित एका सैन्याच्या चौकी गुरुवारी हिमस्खलनात बर्फाखाली गाडली गेली. यावेळी या चौकीत उपस्थित असलेले १० जवान शहीद झाल्याचं आता जाहीर करण्यात आलंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद झालेल्या सैनिकांप्रती शोक व्यक्त केलाय. 'ही खूप दु:खद गोष्ट आहे. देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर-जवानांना मी सलाम करतो' असं त्यांनी म्हटलंय. 
 
गुरुवारी झालेल्या या दुर्घटनेनंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही बचाव कार्य सुरू होतं. लडाख क्षेत्रात उत्तर ग्लेशिअर सेक्टरमध्ये १९,६०० फूटांवर स्थित ही चौक हिमस्खलनात गाडली गेली होती. यावेळी इथं मद्रास बटालियनचे जवान तैनात होते.