आज भारत बंद! संपात सहभागी होणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

देशभरातील कामगार संघटनांनी आज देशव्यापी संपाची हाक दिलीय. कामगार कायद्यातील कामगार विरोधी सुधारणांना विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आलाय. 

Updated: Sep 2, 2015, 04:05 PM IST
आज भारत बंद! संपात सहभागी होणाऱ्यांवर कारवाईचा इशारा title=

नवी दिल्ली : देशभरातील कामगार संघटनांनी आज देशव्यापी संपाची हाक दिलीय. कामगार कायद्यातील कामगार विरोधी सुधारणांना विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आलाय. 

दरम्यान,  सरकारी कर्मचारी या संपात सहभागी होतील, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्र सरकारनं दिलाय.

अधिक वाचा - 'कामगार दिनी' कामगारांचा काळा दिवस

देशातील १० ट्रेड युनियन्सचे जवळपास १५ करोड कर्मचारी आज (बुधवारी) संपावर आहेत. यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबाईड, सिडबी आणि पोस्ट ऑफिसचे कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. या संपामुळे २५ सरकारी आणि ११ खाजगी बँकांच्या कामावरही परिणाम जाणवू शकतो. यासोबतच ट्रान्सपोर्ट, गॅस आणि वीज पुरवठ्यावरही परिणाम जाणवू शकतो. 

या संपात देशभरातील १५ कोटी कामगार सहभागी होणार असल्याचा दावा केला जातोय. सरकारी तसंच खासगी कंपन्यातले कर्मचारी त्यात सहभागी होणार आहेत. 

अधिक वाचा - संपाला आळा, कामगारवर्गाला झळा

शिक्षकांनीही या संपाला पाठिंबा दिलाय. मात्र शाळा-कॉलेजं सुरू राहणार आहेत. बॅंक, इन्शुरन्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत गिरणी कामगार देखील संपात भाग घेणार आहेत. विविध गिरणी कामगार संघटना भारतमाता सिनेमाजवळ आंदोलन करणार आहेत. 

मात्र, भाजप आणि शिवसेनाप्रणित संघटना या संपात सहभाग घेणार नसल्यानं, मुंबईत बेस्ट, टॅक्सी आणि रिक्षा सुरळीत सुरू राहण्याची शक्यता आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.