बंगळुरूत विद्यार्थीनीची गोळ्या घालून हत्या

बंगळुरूमध्ये एका १८ वर्षीय विद्यार्थीनीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. बारावीत शिकणाऱ्या या तरूणीची एका वसतिगृहात मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याची शक्यता आहे.

Updated: Apr 1, 2015, 06:41 PM IST
बंगळुरूत विद्यार्थीनीची गोळ्या घालून हत्या title=

बंगळुरू : बंगळुरूमध्ये एका १८ वर्षीय विद्यार्थीनीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. बारावीत शिकणाऱ्या या तरूणीची एका वसतिगृहात मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळूर शहराजवळील कदुगोडी येथील प्रगती वसतिगृहात ही घटना घडली आहे.  विद्यार्थीनी शिकत असलेल्या शाळेतील कार्यालयात काम करत असलेल्या महेश याने विद्यार्थीनीवर गोळीबार केला. 

कर्नाटकमधील तुमाकुरू जिल्ह्यातील ही विद्यार्थीनी असून, महेशने तिच्या मैत्रिणीवरही हल्ला केला. महेश फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.