`चीनचा भारतीय जमिनीवर कब्जा नाही`

By Shubhangi Palve | Last Updated: Friday, September 6, 2013 - 20:16

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारताचा कुठलाही भूभाग चीनच्या ताब्यात जाऊ देण्याचा प्रश्नच नाही, असं सांगत संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी यांनी याबाबतची चर्चा निराधार असल्याचं म्हटलंय.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीचे अध्यक्ष श्याम सरन यांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये चीननं लडाखमधली ६४० चौ. मीटर भारतीय भूभागावर आपला कब्जा केल्याचं म्हटलं होतं. आज संरक्षण मंत्री ए. के. अॅन्टोनी यांनी सरन यांच्या अहवालावर लोकसभेत निवेदन केलं. यावेळी ‘अहवालात कुठेही चीननं भारत भूमीवर कब्जा केल्याचा उल्लेख नाही... भारतानं आपली एक इंच जमीनही चीनला देण्याचा प्रश्नच येत नाही’ असं म्हणत त्यांनी सभेला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय हितासाठी सीमावर्ती क्षेत्रात संरक्षण व्यवस्था काटेकोरपणे राहील, असंही त्यांनी म्हटलंय. देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

सरन यांच्या अहवालावर भाजप आणि समाजवादी पक्षानं सरकारवर जोरदार हल्ला चढवत संरक्षणमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी केली होती.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, September 6, 2013 - 17:42
comments powered by Disqus