बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेचा 'वजीर'!

शिवसेनेनं बिहार निवडणुकीच्या प्रचाराची धुरा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये आदित्य ठाकरे यांच्या प्रचारच्या सभा होण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 21, 2015, 11:08 AM IST
बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेचा 'वजीर'! title=

मुंबई : शिवसेनेनं बिहार निवडणुकीच्या प्रचाराची धुरा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये आदित्य ठाकरे यांच्या प्रचारच्या सभा होण्याची शक्यता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्याही निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशा वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिरावरचा थोडा भार हलका करण्यासाठी बिहार निवडणुकांमध्ये आदित्यला लक्ष घालायला सांगितलंय. तर उद्धव ठाकरे हे स्वत: कडोंमपाच्या निवडणुकीवर जातीनं लक्ष घालणार आहेत.

अधिक वाचा - भाजपला शिवसेनेचे आव्हान; बिहारमध्ये लढवणार १५० जागा 

बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ जागांपैंकी १५० जागा शिवसेना लढवणार आहे. एनडीएमध्ये मित्र पक्ष असतानाही बिहार निवडणुकीत भाजपकडून विचारणा न झाल्याने नाराज शिवसेनेनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. 
  
या निवडणुकीसाठी १०० उमेदवार निश्चित झाले असून ५० उमेदवारांची आगामी काळात निवड करण्यात येणार आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.