पासपोर्टधारकांसाठी सर्वात महत्वाची बातमी

आता हस्तलिखित पासपोर्ट मंगळवारपासून इतिहास जमा होणार आहे. जगातील दहशतवादासमेत विविध सुरक्षा कारणास्तव आता केवळ इलेक्ट्रॉनिक पासपोर्टही सर्व देशात स्वीकारले जाणार आहे. 

Updated: Nov 24, 2015, 04:22 PM IST
पासपोर्टधारकांसाठी सर्वात महत्वाची बातमी title=

मुंबई : आता हस्तलिखित पासपोर्ट मंगळवारपासून इतिहास जमा होणार आहे. जगातील दहशतवादासमेत विविध सुरक्षा कारणास्तव आता केवळ इलेक्ट्रॉनिक पासपोर्टही सर्व देशात स्वीकारले जाणार आहे. 

आंतरराष्ट्रीय नागरीक उड्डयन संघटनेच्या नियमांनुसार मंगळवारपासून नागरिक हस्तलिखित पासपोर्टचा वापर करू शकणार नाही. तसेच यावर व्हिसाही जारी करण्यात येणार नाही. हा पासपोर्ट आपोआप रद्द होणार आहे. 

आता लागणार पैसे 
पासपोर्ट विभागाने हस्तलिखित पासपोर्ट इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट बदलण्यासाठी विशिष्ट कालावधी दिला होता. यासाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नव्हते. पण आता हा बदल करण्यासाठी शुल्क लागणार आहे. 

एकरूपतेसाठी देण्यात आले आदेश 
विविध देशांच्या व्हिसा देण्याची भाषा वेगवेघळी असते इमिग्रेशनवेळी मशी रीड नही करत असेत अशामुळे बार कोड समरूपतेसाठी इलक्ट्रो मार्क्ड पासपोर्टही मान्य करण्यात येणार आहे. 

2002 पूर्वीचे पासपोर्ट रद्द होणार
2002 पूर्वी हस्तलिखित पासपोर्ट बनविण्यात येते होते. हे पासपोर्ट 20 वर्षासाठी बनविण्यात येत होते. ज्यांनी 2002 पूर्वी पासपोर्ट बनविले त्यांचे पासपोर्ट रद्द होणार आहे. 2012 पासून कम्प्युटरच्या माध्यमातून पासपोर्ट बनिवण्यात आले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.