'चिल्लर पार्टी' नव्हे ही तर 'थिल्लर पार्टी'!

`लोकशाही` या शब्दाला लाजवेल अशा घटना सध्या संसदेत आणि विधानसभेसारख्या ठिकाणी घडताना दिसत आहेत. नुकतंच लोकसभेत खासदारांनी `मिरची स्प्रे कांड` घडवून आणलं होतं... त्यानंतर आज पुन्हा एकदा `उघडबंब` नेत्यांनी संसदीय परंपरा धुळीला मिळवल्याचं दिसून आलं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 19, 2014, 03:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, दिल्ली
`लोकशाही` या शब्दाला लाजवेल अशा घटना सध्या संसदेत आणि विधानसभेसारख्या ठिकाणी घडताना दिसत आहेत. नुकतंच लोकसभेत खासदारांनी `मिरची स्प्रे कांड` घडवून आणलं होतं... त्यानंतर आज पुन्हा एकदा `उघडबंब` नेत्यांनी संसदीय परंपरा धुळीला मिळवल्याचं दिसून आलं. लोकशाहीच्या नावाखाली इथं 'चिल्लर पार्टी' नाही तर 'थिल्लर पार्टी'च सुरू असल्याचं चित्र उभ्या देशानं पाहिलं.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या संसदीय आणि विधानसभा अधिवेशनात, तेलंगना विषयावर राज्यसभा महासचिवांकडून कागद खेचून घेऊन ते हवेत उडवण्यात आले. तसंच यूपी-जम्मू-काश्मीर विधानसभेत लज्जास्पद घटना घडल्या. उत्तरप्रदेशात तर दोन आमदारांनी आपले शर्ट उतरवल्यानं एकच खळबळ उडाली.
उत्तरप्रदेशात `उघडबंब` आमदार
उत्तर प्रदेशात विधानमंडळ सत्रात घोषणाबाजीनंच सुरुवात झाली. आत्तापर्यंत कुठेही घडली नसेल अशी घटना यूपी विधानसभेत लोकांनी पाहिली. `आरएलडी`चे आमदार वीर पाल राठी आणि सुरेश शर्मा यांनी भर विधानसभेतच आपले कपडे उतरवले. त्यांनी यूपी सरकारवर निशाणा साधत राज्य सरकारच्या नीतीमुळे गरीब कामगार वर्ग नग्न होत असल्याचं म्हटलं. याला आपला विरोध दर्शविताना दोन्ही आमदारांनी आपले कपडे उतरवून जोरदार प्रदर्शन केलं. तसंच राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यानही मुख्य विरोधी पक्ष असलेल्या बहुजन समाज पार्टीसोबत राष्ट्रीय लोकदलाच्या सदस्यांनी सराकारविरोधी घोषणाबाजी केली.
जम्मूत `कानाखाली` दिल्याचा आवाज घुमला
दुसरीकडे, जम्मू विधानसभेत बुधवारी जोरदार हंगामा झाला. पीडीपी आमदारानं नाराज होऊन एका विधानसभा कर्मचाऱ्याला एक जोरदार कानाखाली वाजवली. पीडीपी आमदार सय्यद बशीर यांच्या कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारताच सदनात जोरदार हंगामा घडविला गेला... आणि सदनात एकच खळबळ उडाली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.