अखिलेशच होईल पुढचा मुख्यमंत्री, मुलायमसिंग यांची गुगली

समाजवादी पार्टीमध्ये सुरू असलेल्या कौटुंबिक कलहानं आज नवं वळण घेतलं आहे.

Updated: Jan 9, 2017, 09:59 PM IST
अखिलेशच होईल पुढचा मुख्यमंत्री, मुलायमसिंग यांची गुगली  title=

लखनऊ : समाजवादी पार्टीमध्ये सुरू असलेल्या कौटुंबिक कलहानं आज नवं वळण घेतलं आहे. पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांनी अखिलेश यादव हेच पुढले मुख्यमंत्री असतील, असं आश्चर्यजनक विधान केलंय.

गेल्या आठवड्याभरापासून मुलायम आणि अखिलेश यांच्या गटांमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. पक्ष जवळजवळ फुटला असून खरा पक्ष कोणाचा याबाबतचा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलाय.

सकाळी मुलायमसिंगांनी स्वतः निवडणूक आयोगात जाऊन आपली बाजू मांडली. आपणच पक्षाचे अध्यक्ष आहोत, त्यामुळे नाव आणि चिन्हावर आपलाच दावा आहे, असं ते म्हणाले. अखिलेश यांनीही आपले काका रामगोपाल यादवांना निवडणूक आयोगाकडे पाठवून चिन्हाचा निर्णय लवकर घेण्याची मागणी केली. सकाळी हे घडलं असताना संध्याकाळच्या वेळी मात्र मुलायम यांनी अचानक अखिलेश स्तुती केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात.