या मंत्र्यांकडे आहे सर्वाधिक सोने

केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर सरकारने सोन्यावर सर्जिकल स्ट्राईक केला. यानुसार घरात किती सोने असावे याची मर्यादा घालून देण्यात आलीये. 

Updated: Dec 3, 2016, 01:47 PM IST
या मंत्र्यांकडे आहे सर्वाधिक सोने title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर सरकारने सोन्यावर सर्जिकल स्ट्राईक केला. यानुसार घरात किती सोने असावे याची मर्यादा घालून देण्यात आलीये. 

यादरम्यानच मंत्र्यांकडेही किती सोने आहे याचा तपशील समोर आलाय. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडेच तब्बल पाच किलो ६३० ग्रॅम सोने तर १५ किलो चांदी आणि ४५ लाखांचे हिरे आहेत. 

जेटलींपाठोपाठ दुसरा नंबर लागतो तो मनेका गांधी यांचा. मनेका यांच्याकडे ३.४१ किलो सोन्याचे दागिने आणि ८५ किलो चांदी आहे. उमा भारती यांच्याकडे सोने-चांदीची भांडी, देवाचे दागिने मिळून सहा किलो वजनाची सोने-चांदी आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे २२५ ग्रॅम सोन्याची नाणी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 45 ग्रॅम सोने आहे. 

रसायने व खतेमंत्री अनंतकुमार यांच्या पत्नीकडे ८० तोळे सोने आणि १० किलो चांदी आहे. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाच लाख ६८ हजारांचे, तर पत्नीकडे १५ लाखांचे दागिने आहेत. 

केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज सोने आणि चांदीचे मिळून ३० लाख रुपयांचे दागिने आहेत. वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केवळ १६.३५० ग्रॅम वजनाचे दागिने असल्याचे समोर आलेय.