अरुण जेटली मांडणार आर्थिक सर्वेक्षण अहवाल

बजेटआधी आज अर्थमंत्री अरुण जेटली 2013-14 या वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत मांडणार आहेत. आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये बजेटची झलक पाहायला मिळणार आहे. 

Updated: Jul 9, 2014, 11:41 AM IST
अरुण जेटली मांडणार आर्थिक सर्वेक्षण अहवाल  title=

नवी दिल्ली : बजेटआधी आज अर्थमंत्री अरुण जेटली 2013-14 या वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत मांडणार आहेत. आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये बजेटची झलक पाहायला मिळणार आहे. 

आर्थिक विकासाला पुढे घेऊन जाण्यासाठी योजनांची एक झलक या आर्थिक सर्वेक्षण अहवालात दिसेल. आर्थिक सर्वेक्षणामध्ये यंदा देशाच्या विकासाच्या गतीचा अंदाज व्यक्त केला जाईल. फिक्कीच्या मतानुसार विकासदर 5.3 टक्के राहण्याची शक्यता आहे. 

परदेशी गुंतवणुकीसंदर्भात बदल कशा प्रकारचे असतील आणि सरकारचं याबाबत काय धोरण आहे याची झलकही या रिपोर्टमधून पहायला मिळेल. रोजगार वृद्धीसाठी सरकारची काय रणनिती असू शकेल त्याबाबतचा आढावाही आर्थिक सर्वेक्षणात घेण्यात येईल. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कडक निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.