अरुणाभ लायाने भारताचे नाव मोठे केले

अनेकांचं जे स्वप्न असतं. तेच स्वप्न कोलकतातील १९ वर्षीय अरुणाभ लायाने प्रत्यक्षात उतरवलं आहे.

Updated: Apr 21, 2014, 04:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोलकता
अनेकांचं जे स्वप्न असतं. तेच स्वप्न कोलकतातील १९ वर्षीय अरुणाभ लायाने प्रत्यक्षात उतरवलं आहे. अमेरीकेच्या कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या SAT (Standardized Examination for admission to American Colleges) च्या परीक्षेत अगदी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. या कर्तुत्वाने अरुणाभ याने अपल्या आई वडीलांसोबतच संपूर्ण देशाचं नाव मोठं केलं आहे. अरुणाभने या प्रवेश परीक्षेत २४०० पैकी २४०० इतके गूण मिळाले आहेत.
अरुणाभ हा कोलकतामधील दिल्ली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. अरुणाभचे आई वडील हे डॉक्टर आहेत. पण अरुणाभच्या करीअरसाठी त्यांनी आपल्या प्रोफेशनपासून जरा लांबच आहेत. अरुणाभला हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, कोलंबिया, ड्यूक, कॉर्नेल आणि जॉर्जिया यूनिवर्सिटी मधून अॅडमिशनसाठी बोलवणं आलं आहे. या कारणाने कोणत्या यूनिवर्सिटीत अभ्यास करायचा याचा निर्णय घेताना अरुणाभ हा गोंधळलेल्या परीस्थितीत अडकला आहे.
कोलंबिया यूनिवर्सिटी ने अरुणाभला प्रसिद्ध अशी सी. प्रेस्कॉट डेविस स्कॉलरशिप देण्याची ऑफर दिली आहे. या स्कॉलरशिपच्या आधारे अरुणाभला इलीट स्टूडेंट्सच्या प्रभागात ठेवण्यात येईल. तसेच त्याला १०२ नोबेल विजेते आणि फॅकलटीज् सोबत काम प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळणार आहे. ड्यूक यूनिवर्सिटीने देखील अरुणाभला कर्ष इंटरनॅशनल स्कॉलरशिप ऑफर केली आहे. या यूनिवर्सिटीने पहिल्यांदाच भारतीय विद्यार्थ्याला या स्कॉलरशिपची ऑफर दिली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.