आसाममध्ये पूर, राज्यस्थानमध्ये पाऊस

 एकीकडे महाराष्ट्राला वरुणराजानं हुलकावणी दिलीय तर दुसरीकडे आसामला पावसानं चांगलंच झोडपलंय. गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. अनेक लोक पुरात अडलेत.

PTI | Updated: Jun 27, 2014, 07:51 PM IST
आसाममध्ये पूर, राज्यस्थानमध्ये पाऊस title=
अासाममध्ये अशी पूरस्थिती आहे.

गुवाहाटी : एकीकडे महाराष्ट्राला वरुणराजानं हुलकावणी दिलीय तर दुसरीकडे आसामला पावसानं चांगलंच झोडपलंय. गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. अनेक लोक पुरात अडलेत.

पुरामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. गुवाहाटीमधल्या अनेक भागात पाच ते सहा फूट पाणी साचलंय. अनिल नगर, राजगड अशा नागरी वसाहतीमध्ये पाणी शिरलंय. पुरामुळे पाणी घुसल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

वीजेचा धक्का आणि दरड कोसळल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झालाय.. एनडीआरएफ आणि एसडीआरएफनं इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलंय. तर दुसरीकडे राजस्थानमध्येही पाऊस झालाय. राजस्थानमध्ये जयपूर, अलवर , भरतपूर याठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे येथील उकाड्याने हैराण असलेल्यांना दिलासा मिळाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.