'पीके' दाखवणाऱ्या दोन सिनेमागृहांवर बजरंग दलाचा हल्ला

आमीर खानच्या पीके चित्रपटाविरोधात काही हिंदू संघटना एकवटल्या आहेत, बजरंग दलाने काही सिनेमा गृहांसमोर तीव्र निदर्शनं केली आहेत.

Updated: Dec 29, 2014, 07:09 PM IST
'पीके' दाखवणाऱ्या दोन सिनेमागृहांवर बजरंग दलाचा हल्ला title=

अहमदाबाद : आमीर खानच्या पीके चित्रपटाविरोधात काही हिंदू संघटना एकवटल्या आहेत, बजरंग दलाने काही सिनेमा गृहांसमोर तीव्र निदर्शनं केली आहेत.

 हिंदूच्या देवतांचा अवमान करणारी दृष्ये असल्याचा आरोप करत आमिर खानच्या पीके या चित्रपटाविरोधात भारतातल्या विविध शहरांमध्ये निषेध व्यक्त होत असताना अहमदाबादमध्ये बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहात तोडफोड करण्याचे प्रकार घडले आहेत. 

याच प्रकारची निदर्शने भोपाळमध्येही झाली असून सोसल मीडियावरही या चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी दृष्ये असल्याच्या पोस्ट फिरत आहेत.

अहमदाबादमधल्या बजरगं दलाचे प्रमुख ज्वलित मेहता यांच्या नेतृत्वाखाली सिटी गोल्ड आणि  शिव थिएटर्स या चित्रपटगृहांवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. त्यांनी तिकिट खिडक्यांवर दगडफेक केली तसेच चित्रपटाची पोस्टर्स फाडली. पोलिसांनी घ़नास्थळी तातडीने धाव घेतली परंतु, तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते.

सोमवारी सकाळी १०च्या सुमारास हा प्रकार घडला असून सीसीटिव्ही फूटेजच्या आधारे ही नासधूस करणा-यांची ओळख पटवण्यात येत असल्याचे पोलीसांनी सांगितले. 

अर्थात बजरंग दलाने या हल्ल्यांची जबाबदारी घेतली असून मेहता यांनी अन्य सिनेमागृहांनीदेखील हा चित्रपट दाखवणे बंद करावे असा फतवा काढला आहे. 

आमीर खानचा हेतू स्वच्छ असेल तर त्याने त्याच्या धर्माबद्दल म्हणजे इस्लामबद्दल काहीच का दाखवले नाही असा सवाल मेहता यांनी केला असून हिंदूंच्या देवतांबद्दल आक्षेपार्ह दृष्ये पीकेमध्ये दाखवली असल्याचा आरोप केला आहे.

अनुष्का शर्मा या भारतीय मुलीचे सुशांत सिंग राठोड या पाकिस्तानी मुलाशी असलेले प्रेमसंबंधही लव्हजिहादचा प्रसार करतात असा आक्षेप बजरंग दलाने घेतला आहे. पीकेने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात २०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून हा चित्रपट हिट चित्रपटांच्या यादीत गेला आहे.

माझा चित्रपट स्वत:च काय ते बोलतो, बाकी अशा आरोपांबाबत व निदर्शनांबाबत मी काय बोलणार अशी प्रतिक्रिया आमीरने दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.