फोटो : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी अगोदर बारबालांचे ठुमके!

आज, शुक्रवारी बिहार मुख्यमंत्री म्हणून नितिश कुमार यांचा शपथविधी पार पडला. याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी रात्री मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी बारबालासोबत जोरदार धिंगाणा केलेला पाहायला मिळाला. 

Updated: Nov 20, 2015, 09:05 PM IST
फोटो : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी अगोदर बारबालांचे ठुमके!  title=

पाटणा : आज, शुक्रवारी बिहार मुख्यमंत्री म्हणून नितिश कुमार यांचा शपथविधी पार पडला. याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी रात्री मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी बारबालासोबत जोरदार धिंगाणा केलेला पाहायला मिळाला. 

गुरुवारी रात्री कल्याणबीघा या नितीश कुमार यांच्या गावात त्यांच्या समर्थकांनीच बारबालांसोबत जोरदार ठुमके लगावले. जवळपास एक डझन बारबालांना इथं डान्ससाठी बोलावण्यात आलं होतं. 


बारबालांचे ठुमके

संपूर्ण रात्रभर नितीश कुमार मुख्यमंत्री बनणार म्हणून हा 'बारबाला डान्स सोहळा' सुरू होता. कोलकातावरून या बारबालांना आमंत्रण देण्यात आलं होतं. या बारबालांनी भोजपूरी आणि बॉलिवूडच्या गाण्यांवर जबरदस्त डान्स केला. 

VIDEO : लालूंच्या नववी पास मुलाला नीट मंत्रिपदाची शपथही घेता आली नाही!

आजूबाजूच्या गावांतील शेकडो लोक इथं हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजर झाले होते. दारुची होळीही इथं खेळली गेली. या कार्यक्रमाची तयारी गेल्या आठवड्याभरापासून सुरू असल्याचं सांगण्यात आलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.