तामिळनाडूत काँग्रेसला धक्का, वासन यांचा राजीनामा, स्वत:चा पक्ष काढणार

तामिळनाडूतील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जी.के. वासन यांनी सोमवारी दुपारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. वासन यांनी पक्ष सोडल्यानं तामिळनाडूमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वासन हे तामिळनाडूतील दिवंगत काँग्रेस नेते जी. के. मोपनार यांचे पुत्र आहे. 

Updated: Nov 3, 2014, 03:11 PM IST
तामिळनाडूत काँग्रेसला धक्का, वासन यांचा राजीनामा, स्वत:चा पक्ष काढणार title=

चेन्नई: तामिळनाडूतील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जी.के. वासन यांनी सोमवारी दुपारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. वासन यांनी पक्ष सोडल्यानं तामिळनाडूमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वासन हे तामिळनाडूतील दिवंगत काँग्रेस नेते जी. के. मोपनार यांचे पुत्र आहे. 

तामिळनाडूच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी विरोधीगटातील नेत्याची निवड झाल्यापासून जी.के वासन पक्षावर नाराज होते. काँग्रेसनं पक्ष कार्यकर्ते आणि तामिळनाडूतील जनतेच्या भावनांचा आदर केला नाही अशी टीका करत वासन यांनी सोमवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तामिळनाडूतील युवा पिढीला आता नवीन राजकीय पर्याय हवा असून आम्ही नवीन पक्ष स्थापन करु अशी घोषणाही त्यांनी केली. 

पक्षाचं नाव, चिन्ह आणि झेंडा याविषयी लवकरच माहिती दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. जी.के. वासन हे तामिळनाडूतील ज्येष्ठ काँग्रेस नेते जी. के. मोपनार यांचे पुत्र आहेत. मोपनार यांनीही कालांतराने काँग्रेसमधून बाहेर पडत 'तामिळ मनिला काँग्रेस' या पक्षाची स्थापना केली होती. मात्र मोपनार यांच्या निधनानंतर वासन यांनी टीएमकेला काँग्रेसमध्ये विलीन केलं होतं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.