BSFचा जवान रॉकी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

जम्मूतील उधमपूर  येथील हल्ल्यात शहीद झालेला BSFचा जवान रॉकी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

PTI | Updated: Aug 7, 2015, 07:03 PM IST
BSFचा जवान रॉकी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार title=

यमुनानगर : जम्मूतील उधमपूर  येथील हल्ल्यात शहीद झालेला BSFचा जवान रॉकी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

हरियाणामध्ये यमुनानगर या त्यांच्या मुळ गावी रॉकी यांचे मोठं बंधू रोहित कुमार यांनी अग्नीसंस्कार केला. यावेळी BSFचे सहाय्यक महानिरीक्षक ए. के. गुलिया, स्थानिक जिल्हा प्रशासनातले अधिकारी, जिल्ह्यातले पोलीस अधिकारी आणि BSFचे अनेक जवान उपस्थित होते.

५ ऑगस्टला जम्मू-श्रीनगर हायवेवर BSFच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी भीषण हल्ला चढवला. यावेळी आपल्या ४४ निःशस्त्र सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी रॉकीनं प्राणांची आहुती दिली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.