पंजाब-गोव्यात प्रचाराच्या तोफा थंडावणार

 येत्या चार तारखेला होणाऱ्या गोवा आणि पंजाबच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे

Updated: Feb 2, 2017, 07:54 AM IST
पंजाब-गोव्यात प्रचाराच्या तोफा थंडावणार  title=

चंदीगड : येत्या चार तारखेला होणाऱ्या गोवा आणि पंजाबच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सर्वच पक्षांचे दिग्गज दोन्ही राज्यात प्रचाराच्या रणधुमाळी उतरत आहेत.

गोव्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची सभा होणार आहे. तर राहुल गांधी पंजाबात सभा घेणार आहेत. गोवा आणि पंजाब दोन्ही राज्यात भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. या दोन्ही राज्यात सत्ता टिकवण्याचं आव्हान भाजप समोर आहे.