निवडणुकीवर होणार नोटबंदीचा हा परिणाम

केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या मुद्द्यावरून देशात मोठ्याप्रमाणावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम राजकीय पक्षांवर आणि आगामी उत्तरप्रदेश निवडणुकीवर देखील दिसणार आहे.

Updated: Nov 29, 2016, 08:32 PM IST
 निवडणुकीवर होणार नोटबंदीचा हा परिणाम title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या मुद्द्यावरून देशात मोठ्याप्रमाणावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम राजकीय पक्षांवर आणि आगामी उत्तरप्रदेश निवडणुकीवर देखील दिसणार आहे.
 
राजकीय तज्ज्ञाच्या मते, नोटाबंदीच्या निर्णयानंतर भाजपासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. 2019 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत इतर पक्षांच्या तुलनेत पंतप्रधान मोदींचा मार्ग मोकळा असणार आहे, कारण उत्तरप्रदेशची निवडणूक अतिशय खर्चिक मानली जाते. निवडणुकीसाठी लागणारा खर्च हा चार करोडपेक्षा जास्त असतो. आणि त्यातील अनेक व्यवहार हे रोख स्वरूपात होतात.परंतु भाजपाला या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे नोटाबंदी निर्णयाचा फायदा होणार आहे. इतर पक्षांसमोर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

भाजप आणि त्याच्या राजकीय तज्ज्ञाचे मत आहे की, नोटबंदी निर्णयाचा सर्वसामान्यांना त्रास झाला, परंतु भाजप भावनात्मक पद्धतीने या निर्णयावर लोकांना जोडण्यात यशस्वी झाला आहे. सरकार आणि भाजपला विश्वास आहे की, हळूहळू परिस्थितीत सुधारणा होऊन लोकांचा राग शांत होईल आणि लोक काळ्यापैसा विरोधाच्या चळवळीचे समर्थन करतील.

शॉर्ट टर्मसाठी हा निर्णय नुकसानकारक वाटत असला, तरी व्यापक दृष्टीकोनातून फायदेशीर आहे. कारण उत्तरप्रदेशातील 65 टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही 35 वयापेक्षा कमी वयोगटाची आहे.  या वयोगटातील लोकांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
 
निवडणुकीसाठी पक्षांच्या निघणाऱ्या रॅलीसाठी तसेच सभांना लागणाऱ्या खर्चाची व्यवस्था करणे, मतदारांमध्ये वाटले जाणारे पैसे यांची जुळवाजुळव करणे आता इतर राजकीय पक्षांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी कठीण जाणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणुकीची तयारी कशी करायची असा प्रश्न पडला आहे.  

सर्वपक्षांसमोर आता राजकीय सभा आयोजित करणे कठीण असणार आहे, आमचे धोरण आहे की छोट्या छोट्या सभा आणि रॅलीच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहचणार आहे, असे बसपाच्या एका मोठ्या नेत्याने सांगितले आहे.